PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
21 SEP 2020 7:42PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 21 सप्टेंबर 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या भिवंडी इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
भिवंडी इथली इमारत दुर्घटना दुःखदायी असून मृतांच्या कुटुंबियाप्रती शोकभावना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवरच्या संदेशात म्हटले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतानाच मदत आणि बचाव कार्य सुरु असून बाधितांना सर्वतोपरी सहाय्य पुरवले जात असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये 14000 कोटी रुपयांच्या नऊ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि राज्यात ऑप्टिकल फायबरमार्फत इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या प्रकल्पाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ केला.
संसदेत कृषी विधेयके मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. देशातील कृषीक्षेत्राच्या इतिहासातील हा आमूलाग्र बदल घडवणारा महत्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- देशात, गेल्या 24 तासांत एकूण 86,961 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 76 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 20,000 पेक्षा जास्त आहे, तर आंध्रप्रदेशातील रूग्णांचा वाटा 8,000 पेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 455 लोक मृत्यूमुखी पडल्याची नोंद झाली असून त्यानंतर कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथे अनुक्रमे 101 आणि 94 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
- भारतात रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दराने 80% पर्यंत पोहोचत महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. बरे होणाऱ्या रूग्णसंख्येत वाढ होऊन , भारतात सलग तिसऱ्या दिवशी 90,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद केली गेली.गेल्या 24 तासात 93,356 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
- भारत बायोटेक लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून तयार झालेले व्यक्ती आणि त्यांच्या मुलीचे डॉ हर्षवर्धन यांनी अभिनंदन केले. संसर्गजन्य आजार आणि साथ याचे सुरुवातीलाच व्यापक सर्वेक्षण, जिल्हा रुग्णालयात संसर्गजन्य आजार विभागाची सुरुवात आणि व्यवस्थापन, एकात्मिक सार्वजनिक प्रयोगशाळांची स्थापना इत्यादि सोयींसाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून कोविड-19 संक्रमण परिस्थितीत सार्वजनिक आरोग्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वेळोवेळी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 2020-21 आर्थिक वर्षात 10.09.2020 पर्यंत 4256.81 कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत.
- केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने (CPCB) कोविड-19 संक्रमण परिस्थितीत मास्क आणि ग्लोव्हजसह जैव-वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसंबंधी सुधारीत नियमावली 17.07.2020 रोजी जारी केली आहे.
- मार्च 2020 मध्ये कोविड - 19 च्या वाढत्या घटना लक्षात घेता पुण्यात लष्कराचे स्वतंत्र कोविड - 19 रुग्णालय असणे आवश्यक होते जेणेकरुन बहु-उद्देशीय सदन कमांड रुग्णालयाला बिगर-कोविड रुग्णांवर व्यवस्थित उपचार करता येतील. मुख्यत: सेवेतील कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपचार करण्यासाठी 29 मार्च 2020 पासून एआयसीटीएस, कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले. 600 खाटांचे हे रुग्णालय कोविड सुविधा असलेल्या 400 खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले. यामध्ये 350 अलगीकरण खाटा, 20 खाटा गंभीर रुग्णांसाठी (व्हेंटिलेटर), 30 इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) चा समावेश आहे. हे रुग्णालय केवळ सशस्त्र दलातील कोविड रुग्णांसाठीच नव्हे तर पुणे व आसपासच्या भागातील सामान्य रुग्णांसाठीही आधार ठरत आहे.
इतर अपडेट्स:
- कोविड-19 संबंधित कर्तव्यावर तैनात असताना कोविड-19 संसर्गामुळे सीएपीएफच्या जवानांचा मृत्यू झाल्यास मृत्यूच्या वेळी सीएपीएफच्या जवानांना मिळणाऱ्या नियमित लाभांव्यतिरिक्त, “भारत के वीर” निधीतून त्यांच्या वारसांना 15 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंत्यविधीच्या खर्चासाठी त्वरित अनुदान आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन व इतर थकबाकीची प्रक्रिया त्वरित करण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
- खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ठाम भूमिकेमुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन, 160 बनावट खादी उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीला पायबंद
- किमान आधारभूत किंमत निश्चित करताना आयोगाकडून उत्पादनखर्च, विविध पिकांची देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील एकंदरीत मागणी-पुरवठा स्थिती, कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील व्यापरशर्ती, अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम आणि एकूण उत्पादन खर्चाच्या किमान 50 टक्के लाभ या बाबींची शिफारस केली जाते.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा एक भाग म्हणून पीएमयूवाय लाभार्थींना दि. 16 सप्टेंबर, 2020 पर्यंत 13.57 कोटी लाभार्थींना मोफत सिलेंडर पुरविण्यात आले आहेत.
- प्रधानमंत्री-आशा योजने अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्या त्या संपूर्ण राज्य-प्रदेशासाठी आपल्या आवश्यकतेनुसार विशिष्ट तेलबियांच्या पिकांसाठी खरेदी हंगामामध्ये पीएसएस अथवा पीडीपीएस यापैकी कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. डाळी आणि खोबरे यांची खरेदी पीएसएसनुसार करण्यात येणार आहे
- उडाण 4.0 च्या पहिल्या टप्प्यात 78 नवीन मार्गांना मंजूरी- अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, दारणा कॅम्प, देवळाली, धुळे, गोंदिया, जत, कराड, कवळपूर, कुडाळ, लातूर, लोणावळा अॅम्बी व्हॅली, उस्मानाबाद, फलटण, शिरपूर, वाळूज यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
शिक्षकांना मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाची बाधा झाल्यामुळे राज्यातील शिक्षक संघटनांनी कोविड-19 उपचारासाठी विमा संरक्षण पुरवण्याची शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील सुमारे 3.5 लाख शिक्षक कोविड संबंधित कर्तव्यावर रुजु होते. दरम्यान, एका दिलासादायक बातमी, मुंबईनजीकच्या डोंबिवली येथील 106 वर्षीय आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे आणि रविवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जरी महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8.84 लाख असली तरी, राज्यात 2.91 लाख सक्रीय कोविड-19 रुग्ण आहेत.




***
R.Tidke/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657436)
Visitor Counter : 329