आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

‘संडे संवाद’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांचा समाजमाध्यम वापरकर्त्यांशी संवाद


“आत्मनिर्भर भारतातून, भारताला भविष्यात साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी  सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा घडवण्याबाबतची सरकारची कटीबद्धता स्पष्ट

“सार्स-कोविड-2 मध्ये भारतात महत्वाची उत्क्रांती  नाही”

“कोविड-19 साठी आयसीएमआरचे लाळेवर आधारित चाचणीवरील संशोधन प्रगतीपथावर”

Posted On: 20 SEP 2020 9:35PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज संडे संवादया विशेष कार्यक्रमात, सोशल मिडियावर लोकांशी संवाद साधला.यावेळी कोविडच्या सद्यस्थितीसह, विज्ञान क्षेत्रातील भारताची प्रगती आणि इतर विषयांवरही अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले.

सुरुवातीला, भारत बायोटेक लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून तयार झालेले व्यक्ती आणि त्यांच्या मुलीचे हर्षवर्धन यांनी अभिनंदन केले. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत, देशाला अत्यंत मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु असून, भविष्यात, आपल्याला कोविडसारख्या साथीच्या आजाराचा सामना अधिक सक्षमपणे करता यावा, यासाठी, सार्वजनिक आरोग्य सुविधा अत्यंत आधुनिक आणि मजबूत केल्या जात आहेत, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढविणसाठीही सरकार वचनबद्ध आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

या अंतर्गत, संसर्गजन्य आजार आणि साथ याचे सुरुवातीलाच व्यापक सर्वेक्षण, जिल्हा रुग्णालयात संसर्गजन्य आजार विभागाची सुरुवात आणि व्यवस्थापन, एकात्मिक सार्वजनिक प्रयोगशाळांची स्थापना इत्यादि सोयींसाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

इबोला, सार्स आणि इतर संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यात भारताला आलेला अनुभव कोविडच्या आजाराच्या व्यवस्थापनात उपयोगी ठरतो आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात सार्स-कोविड-2 च्या विनाशातुन मोठी उत्क्रांती झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 च्या निदानाबाबत, अलीकडेच सुरु असलेल्या लाळ-आधारित चाचणी विषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, आयसीएमआर ने काही चाचण्या प्रमाणित केल्या आहेत, मात्र यापैकी एकही चाचणी तेवढी विश्वासार्ह सिद्ध झालेली नाही आणि ज्या कंपन्यांना US-FDA ने मंजुरी दिली आहे, त्यांनी अजून केंद्र सरकारशी संपर्क साधलेला नाही. आयसीएमआर या चाचण्यांचे अध्ययन करत असून विश्वासार्ह पर्याय मिळाल्यावर, तो नक्कीच माहिती देऊ असे त्यांनी सांगितले.

कोविड उपचारपद्धती, व्यवस्थापन आणि नियंत्रण याविषयी डॉ हर्ष वर्धन यांनी सविस्तर उत्तरे दिली.

देशात वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरचा पुरेसा पुरवठा असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या काळात देशातील पारंपरिक औषधांचेही महत्व आहे असे त्यांनी सांगितले. आयुष मंत्रालय, आयसीएमआर आणि सीएसआयआर यांनी एकत्र येऊन संशोधन प्रोटोकॉल तयार केले असून, विविध आयुष वैद्यकीय तज्ञांच्या दाव्यांची पडताळणी करत आहे, असेही त्यांनी सांगितले.  

155 कोविड योध्यांच्या 155 कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मदत देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या संकटकाळात सर्वांनी आपल्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे. विशेषतः घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याची माहिती त्यांनी दिली.

देशात कोविड विरोधात सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित व्हायला अजून वेळ लागेल असेही ते म्हणाले.

देशातील अधिकाधिक मनुष्यबळ विज्ञानाकडे वळवण्याबाबत आणि लॉकडाऊनच्या काळात असलेले स्वच्छ पर्यावरण कायम राखण्यासाठी सरकारची भूमिका अशा विषयांवरील प्रश्नांनाही त्यांनी सकारात्मक उत्तरे दिली.

संडे संवादकार्यक्रम संपूर्ण बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :

Twitter: https://twitter.com/drharshvardhan/status/1307583211510231041?s=20

Facebook: https://www.facebook.com/watch/?v=2762717827332810&extid=w4EiYCzwejHsjcCw

Youtube: https://youtu.be/0xwKC77wgxQ

DHV App:http://app.drharshvardhan.com/download

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657086) Visitor Counter : 200