आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संक्रमणकाळात वैद्यकीय कचरा व्यवस्थापन

Posted On: 20 SEP 2020 10:01PM by PIB Mumbai

 

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने (CPCB) कोविड-19 संक्रमण परिस्थितीत मास्क आणि ग्लोव्हजसह जैव-वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसंबंधी सुधारीत नियमावली 17.07.2020 रोजी जारी केली.

सीपीसीबीने जारी केलेल्या नियमावलीनुसार वापरलेले पीपीई जसे फेस शिल्ड, गॉगल्स, हजामत सुट, प्लास्टीक आच्छादन, वापरलेले मास्क, हेड कव्हर, शू कव्हर यांची जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम, 2016 नुसार विल्हेवाट लावावी. जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी किमान 72 तास त्यांची स्वतंत्र साठवणूक करावी. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशाप्रकारचा कचरा गोळा करावा.   

सीपीसीबीने कोविड-19 जैव-वैद्यकीय कचऱ्यासंबंधी देखरेख करण्यासाठी “COVID19BWM” हा अॅप विकसित केला आहे. या अॅपचा वापर केला नाही, अशा 106 सीबीडब्ल्युटीएफसना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सीपीसीबीने कोविड-19 संबंधी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र पेज तयार केले आहे.  

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

****

B.Gokhale/ S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657091) Visitor Counter : 227


Read this release in: English , Manipuri , Telugu