पंतप्रधान कार्यालय

संसदेत कृषी विधेयके मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांचे अभिनंदन

Posted On: 20 SEP 2020 8:42PM by PIB Mumbai

 

संसदेत कृषी विधेयके मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. देशातील कृषीक्षेत्राच्या इतिहासातील हा  आमूलाग्र बदल घडवणारा महत्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे.

या विषयावर केलेल्या अनेक ट्वीटमध्ये, पंतप्रधान मोदी म्हणजे की आजचा दिवस, ‘ देशातील कृषी क्षेत्राच्या इतिहासाला महत्वाचे वळण देणारा क्षण आहे! ही महत्वाची विधेयके संसदेत मंजूर झाल्याबद्दल, देशातील सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचे अभिनंदन ! या विधेयकांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होईल, त्याशिवाय, शेतकरीही कोट्यवधीने सक्षम होतील.

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय शेतकरी विविध जाचक बंधनांमध्ये अडकला होता, दलालांकडून नाडला जात होता. मात्र, आज संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांमुळे शेतकरी बांधव या बंधनांतून आणि जाचातून मुक्त झाला आहे. या विधेयकांमुळे शेतकरी अधिक सक्षम होईल आणि त्याचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल, तसेच त्यांच्या आयुष्यात निश्चित समृद्धी येईल.

आपल्या कृषीक्षेत्राला, शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारे नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आज नितांत गरज आहे. म्हणूनच, हे विधेयक संमत झाल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान सहज उपलब्ध होईल ज्यातून उत्पादनवाढीला मदत मिळेल. हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. 

मी हे आधीही सांगितलं आहे, आज पुन्हा एकदा सांगतो.:

किमान हमीभावाची व्यवस्था पुढेही सुरु राहील. सरकारची कृषीमाल खरेदी करण्याची प्रक्रिया पुढे सुरु राहील. आम्ही इथे आमच्या शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आहोत. त्यांचे कल्याण व्हावे, यासाठी आम्ही शक्य असतील ते सर्व प्रयत्न करु आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठीही एक उत्तम आयुष्य असेल हे सुनिश्चित करु.

A watershed moment in the history of Indian agriculture! Congratulations to our hardworking farmers on the passage of key bills in Parliament, which will ensure a complete transformation of the agriculture sector as well as empower crores of farmers.

— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2020

For decades, the Indian farmer was bound by various constraints and bullied by middlemen. The bills passed by Parliament liberate the farmers from such adversities. These bills will add impetus to the efforts to double income of farmers and ensure greater prosperity for them.

— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2020

Our agriculture sector is in desperate need of latest technology that assists the industrious farmers. Now, with the passage of the bills, our farmers will have easier access to futuristic technology that will boost production and yield better results. This is a welcome step.

— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2020

I said it earlier and I say it once again:

System of MSP will remain.

Government procurement will continue.

We are here to serve our farmers. We will do everything possible to support them and ensure a better life for their coming generations.

— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2020

***

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657077) Visitor Counter : 174