गृह मंत्रालय

सीएपीएफमध्ये कोविड-19 चे रुग्ण 

Posted On: 20 SEP 2020 7:25PM by PIB Mumbai

 

14 सप्टेंबर 2020 रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ) कोविड रुग्ण, मृत्यू दर आणि बरे झालेला रुग्ण दराची दलानुसार सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :-

दलाचे नाव

कोविड रुग्णांची संख्या

% मध्ये मृत्यू दर

 

 % मध्ये बरे झालेल्या रुग्णांचा दर

बीएसएफ

8934

0.26

80.41

सीआरपीएफ

9158

0.39

84.04

सीआयएसएफ

5544

0.43

75.25

आयटीबीपी

3380

0.21

69.79

एसएसबी

3251

0.22

70.77

एनएसजी

225

Nil

76.44

एआर

1746

0.40

61.63

 

कोविड -19 चा संसर्ग झालेल्या सीएपीएफ कर्मचार्‍यांच्या उपचारासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी  सरकारने कोविड -19 रुग्णालये, कोविड दक्षता केंद्र आणि समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) स्थापित केली आहेत.

कोविड-19 संबंधित कर्तव्यावर तैनात असताना कोविड-19 संसर्गामुळे सीएपीएफच्या जवानांचा मृत्यू झाल्यास मृत्यूच्या वेळी सीएपीएफच्या जवानांना मिळणाऱ्या नियमित लाभांव्यतिरिक्त,  “भारत के वीरनिधीतून त्यांच्या वारसांना 15 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंत्यविधीच्या खर्चासाठी त्वरित अनुदान आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन व इतर थकबाकीची प्रक्रिया त्वरित करण्यासाठी मदत करण्यात येत आहे.

गृह राज्यमंत्री  नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

****

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1657039) Visitor Counter : 169