नागरी उड्डाण मंत्रालय
उडाण 4.0 च्या पहिल्या टप्प्यात 78 नवीन मार्गांना मंजूरी
Posted On:
21 SEP 2020 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2020
उडाण योजनेअंतर्गत कोविडपूर्व परिस्थितीत 688 वैध मार्गांना मंजूरी दिली होती. त्यापैकी 281 मार्गांचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला आहे. सरकारने 25.05.2020 पासून देशांतर्गत विमान उडाणांना परवानगी दिली आहे. सरकारने उडाण 4.0 च्या पहिल्या टप्प्यात 78 नवीन मार्गांना मंजूरी दिली आहे.
यात महाराष्ट्रातील अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, दारणा कॅम्प, देवळाली, धुळे, गोंदिया, जत, कराड, कवळपूर, कुडाळ, लातूर, लोणावळा अॅम्बी व्हॅली, उस्मानाबाद, फलटण, शिरपूर, वाळूज यांचा समावेश आहे.
उडाण योजनेअंतर्गत राज्यातील नांदेड-हैदराबाद, मुंबई-कांडला, पोरबंदर-मुंबई, मुंबई-नांदेड, नांदेड-मुंबई, ओझर-दिल्ली, नागपूर-अलाहाबाद, कोल्हापूर- हैदराबाद, कोल्हापूर-बेंगळुरु, नाशिक-हैदराबाद, मुंबई-अलाहाबाद, कोल्हापूर-तिरुपती, जळगाव-अहमदाबाद, पुणे-अलाहाबाद, मुंबई-बेळगाव, मुंबई-दुर्गापूर, मुंबई- कोल्हापूर, मुंबई-जळगाव, नाशिक-पुणे या मार्गांना पूर्वीच उडाण-1, उडाण-2 आणि उडाण-3 मध्ये मंजूरी देण्यात आली आहे.
उडाण अंतर्गत परवानगी देण्यात आलेल्या मार्गांची माहिती येथे पाहता येईल.
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी आज राज्यसभेत लेखी स्वरुपात ही माहिती दिली.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657369)
Visitor Counter : 207