PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
18 NOV 2020 7:50PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
दिल्ली-मुंबई, 18 नोव्हेंबर 2020
उत्कृष्टतेसाठी समान संधी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देशातील सर्व भागातून आणि समाजातील सर्व स्तरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. अतिशय वेगळ्या करिअर मार्गांची आकांक्षा बाळगणारे विद्यार्थी जेएनयूमध्ये एकत्र येतात. हे विद्यापीठ समावेशकता, विविधता आणि उत्कृष्टतेचा मिलाफ आहे, असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (18 नोव्हेंबर, 2020) जेएनयूच्या चौथ्या वार्षिक दीक्षांत समारंभाला एका व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदारांना भारतीय शहरीकरणात गुंतवणुकीचे आमंत्रण दिले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज तिसऱ्या वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, “जर तुम्ही शहरीकरणामध्ये गुंतवणूक करण्याबाबत विचार करत असाल तर भारतात तुमच्यासाठी उत्तम संधी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळुरू टेक समिट, 2020 चे उद्घाटन करणार आहेत. बंगळुरू टेक समिट 19 ते 21 नोव्हेंबर, 2020 दरम्यान होणार आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
दररोजच्या नवीन नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा नवीन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा कल भारताने 1.5 महिन्यांपेक्षा अधिक काळ कायम ठेवला आहे. सलग अकराव्या दिवसासाठी देशात 50,000 हून कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 44,739 कोविड रुग्ण बरे झाले असून 38,617 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 6,122 ने घट होऊन आता सक्रिय रुग्णसंख्या 4,46,805 इतकी झाली आहे. एकूण कोविड-19 रुग्णसंख्येपैकी 5.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या कित्येक आठवड्यांपासून सरासरी दैनंदिन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे.
जनतेमध्ये कोविड योग्य वर्तणूकीचा प्रसार केला गेला असला तरी तो व्यापक स्तरावर महत्वपूर्ण आहे कारण युरोप आणि अमेरिका सारख्या देशात कोविड पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो 93.53 टक्के इतका झाला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83,35,109 इतकी झाली आहे.
नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.98 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक 6,620 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,123 इतकी आहे तर दिल्लीत 4,421 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.
नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी 76.15 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
गेल्या 24 तासात दिल्लीत 6,396, केरळमध्ये 5,792 तर पश्चिम बंगालमध्ये 3,654 नवीन रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात नोंद झालेल्या 474 मृत्यूंपैकी 78.9 टक्के मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
गेल्या 24 तासात झालेल्या मृत्यूंपैकी 20.89 टक्के म्हणजे 99 मृत्यू दिल्लीत झाले आहेत. महाराष्ट्रात 68 आणि पश्चिम बंगालमध्ये 52 मृत्यूंची नोंद झाली.
इतर अपडेट्स:
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज एचआयव्ही प्रतिबंधासाठीच्या मंत्रीस्तरीय जागतिक प्रतिबंध आघाडीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. युएनएड्स आणि युएनएफपीए यांनी जागतिक एचआयव्ही प्रतिबंध आघाडी (जीपीसी) च्या वतीने या परिषदेचे आयोजन केले होते.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते धनबाद येथील सीआयएमएफआर - म्हणजे खनिज आणि इंधन संशोधन केंद्राच्या प्लॅटिनम ज्युबिली स्थापना दिन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नवी दिल्ली येथील सीएसआयआर म्हणजेच विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्यावतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान फेरीवाले विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेअंतर्गत आतापर्यंत 25 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष सूक्ष्म ऋण सुविधा योजनेअंतर्गत 12 लाखांपेक्षा जास्त अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे आणि सुमारे 5.35 लाख रुपये कर्ज वितरित केले आहे.
आरसीएस-उडान (प्रादेशिक संपर्क योजना - उडे देश का आम नागरिक) अंतर्गत कर्नाटकच्या कलबुर्गी इथून उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हिंडन विमानतळ दरम्यान पहिल्या थेट विमानसेवेला आज प्रारंभ झाला. यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालय (एमओसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय)चे अधिकारी उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत 295 मार्ग आणि 5 हेलीपोर्ट्स व 2 वॉटर एयरोड्रोम्ससह 53 विमानतळ कार्यान्वित झाले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेना तर्फे आयोजित एक महिन्याच्या देशव्यापी संविधान दिन युवा क्लब उपक्रम कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. देशातील नागरिकांमध्ये भारतीय राज्यघटने विषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी युवकांना एकत्रित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत स्थापन केलेल्या उच्च कामगिरी कम्प्यूटिंग-कृत्रिम बुद्धिमत्ता (एचपीसी-एआय) सुपर कॉम्प्युटर परम सिद्धिने 16 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या जगातील अव्वल 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालीमध्ये जागतिक क्रमवारीत 63 वा क्रमांक पटकावला आहे. जलद सिमुलेशन, मेडिकल इमेजिंग, जीनोम सीक्वेन्सिंग आणि पूर्वानुमान या माध्यमातून कोविड -19 विरूद्धच्या लढाईत संशोधन आणि विकासाला यामुळे गती प्राप्त होईल आणि भारतीय जनतेसाठी आणि विशेषत: स्टार्ट-अप्स आणि एमएसएमईसाठी हे वरदान आहे.
जानेवारी 2021 मध्ये प्रत्यक्ष स्वरूपात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इफ्फीने 17 नोव्हेंबर 2020 पासून खालील वर्गवारीनुसार प्रतिनिधी नोंदणीला प्रारंभ केला आहे. कोविड 19 महामारीमुळे मर्यादित प्रतिनिधींची प्रथम प्राधान्यक्रमानुसार नोंदणी केली जाईल.
देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झालेला असल्यामुळे छात्रवृत्ती योजनेअंतर्गत करण्यात येणा-या निधी वितरणाला अधिक विलंब होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांसंबंधी सत्यस्थिती नेमकी काय आहे, याची माहिती सामाजिक न्याय आणि सश्क्तिकरण मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्र अपडेट्स:
कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर पालिकेच्या समुद्रकिनारे आणि नदीकाठच्या ठिकाणी छठ पूजा करण्यास परवानगी देणार नाही, असे म्हटले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले की, 20 तारखेला सूर्यास्ताच्या वेळी आणि 21 तारखेला सूर्योदयाच्या वेळी लोक नद्यांच्या किनाऱ्यावर गर्दी करणार नाहीत, याची खात्री शहर पोलिसांना करावी लागेल. सूर्य देवाला प्रार्थना करण्यासाठी कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मर्यादित लोकांना संबंधित अधिकारी परवानगी देतील तसेच पीपीई आणि चाचणी किट सह आवश्यक वैद्यकीय पथके ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले गेले आहेत तेथे तैनात करण्यात येतील, असेही महापालिकेने म्हंटले आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचा दर 92.49 आहे, तर मृत्यू दर 2.63% आहे.
FACT CHECK
* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673847)
Visitor Counter : 233