विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारतातील एआय सुपर कॉम्प्यूटर परमसिद्धी जगातील अव्वल 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालींमध्ये 63 व्या क्रमांकावर

Posted On: 18 NOV 2020 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2020


सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत स्थापन केलेल्या उच्च कामगिरी कम्प्यूटिंग-कृत्रीम बुद्धिमत्ता (एचपीसी-एआय) सुपर कॉम्प्युटर परम सिद्धिने 16 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या जगातील अव्वल 500  सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालीमध्ये जागतिक क्रमवारीत 63 वा क्रमांक पटकावला आहे.

एआय यंत्रणा प्रगत साहित्य, संगणकीय रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र यासारख्या क्षेत्रात पॅकेजेसच्या ऍप्लिकेशनच्या विकासाला बळकटी प्रदान करेल आणि औषधाची रचना आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रणालीसाठी एका व्यासपिठा अंतर्गत अनेक पॅकेजेस विकसित केली जात आहेत आणि मुंबई, दिल्ली, चेन्नई, पटना आणि गुवाहाटी सारख्या पूरग्रस्त मेट्रो शहरांसाठी पूर पूर्वानुमान पॅकेजेस विकसित करण्यात येत आहेत. जलद सिमुलेशन, मेडिकल इमेजिंग, जीनोम सीक्वेन्सिंग आणि पूर्वानुमान या माध्यमातून कोविड -19 विरूद्धच्या लढाईत  संशोधन आणि विकासाला यामुळे गती प्राप्त होईल आणि भारतीय जनतेसाठी आणि विशेषत: स्टार्ट-अप्स आणि एमएसएमईसाठी हे वरदान आहे.

अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर्ससाठी हे एक वरदान आहे आणि एनसीएमआरडब्ल्यूएफ आणि आयआयटीएम द्वारे हवामान अंदाज पॅकेजेस, तेल आणि गॅस शोधासाठी भू-शोध पॅकेजेसच्या चाचणीसाठी; एरो-डिझाइन अभ्यासासाठी पॅकेजेस; संगणकीय भौतिकशास्त्र आणि गणिताचे अनुप्रयोग आणि शिक्षणासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी सहाय्य करेल.

 

“हि एक ऐतिहासिक कामगिरी आहे. जगातील सर्वात मोठ्या सुपर कॉम्पुटर पायाभूत सुविधांपैकी एक आज भारतामध्ये आहे आणि परम सिद्धि-एआयला आज मिळालेल्या क्रमवारीमुळे हे सिद्ध झाले आहे,” असे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा म्हणाले.

परमसिद्धी सुपर कॉम्प्यूटर एनव्हीआयडीए डीजीएक्स सुपर पीओडी संदर्भ आर्किटेक्चर नेटवर्किंग व सी- डॅकच्या स्वदेशी विकसित एचपीसी-एआय इंजिन, सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आणि क्लाऊड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे आणि सखोल शिक्षण, व्हिज्युअल संगणन, आभासी वास्तविकता, प्रवेगक संगणन तसेच  ग्राफिक्स व्हर्च्युअलायझेशन मध्ये मदत करेल. 

 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673746) Visitor Counter : 456