नागरी उड्डाण मंत्रालय
कलबुर्गी ते हिंडन दरम्यान पहिल्या थेट विमान सेवेला प्रारंभ
उडान अंतर्गत आतापर्यंत 295 मार्ग आणि 53 विमानतळ कार्यान्वित
Posted On:
18 NOV 2020 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2020
आरसीएस-उडान (प्रादेशिक संपर्क योजना - उडे देश का आम नागरिक) अंतर्गत कर्नाटकच्या कलबुर्गी इथून उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हिंडन विमानतळ दरम्यान पहिल्या थेट विमानसेवेला आज प्रारंभ झाला.यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालय (एमओसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय)चे अधिकारी उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत 295 मार्ग आणि 5 हेलीपोर्ट्स व 2 वॉटर एयरोड्रोम्ससह 53 विमानतळ कार्यान्वित झाले आहेत.
आरसीएस-उडान-3 बोली प्रक्रियेअंतर्गत गेल्या वर्षी स्टार एअरला कलबुर्गी - हिंडन मार्ग बहाल करण्यात आला. ही कंपनी या मार्गावर तीन साप्ताहिक विमानसेवा चालवणार असून 50 आसनी एम्बरेअर 145 हे आलिशान विमान तैनात करणार आहेत. सध्या ते उडान अंतर्गत 15 मार्गांवर विमानसेवा पुरवतात. आता कलबुर्गी - हिंडन मार्गाच्या समावेशामुळे स्टार एअरसाठी आरसीएस-उडानच्या कक्षेत 16 मार्ग असतील. बरेच लोक या दोन शहरांमध्ये वैयक्तिक तसेच व्यावसायिक उद्देशासाठी वारंवार प्रवास करतात. विजापूर, सोलापूर, बिदर, उस्मानाबाद, लातूर, यादगीर, रंगा रेड्डी, मेडक येथील नागरिकांनाही कलबुर्गी - हिंडन मार्गावरील विमानसेवेचा थेट लाभ मिळणार आहे.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673726)
Visitor Counter : 240