PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 21 MAY 2020 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली-मुंबई, 21 मे 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात अडकलेल्यांसाठी देशांतर्गत विमान प्रवास सुविधा पुरवण्यासाठी कोविड -19 चा सामना करण्यासंदर्भात लॉकडाउनच्या उपाययोजनांवरील मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमानतळांच्या परिचालनासाठी आणि प्रवाशांच्या विमान प्रवासासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहे.

 

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानावर मात करणे डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य होत असून कामे कल्पक पद्धतीने करणेही शक्य होत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. अधिकारपत्रे सादर करण्याचाहा डिजिटल कार्यक्रम म्हणजे राजनैतिक समुदायासमवेत भारताच्या असलेल्या संबंधात विशेष दिवस असल्याचे ते म्हणाले.

 

अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाची दृश्ये पाहून पंतप्रधानांनी पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल अशी इच्छा व्यक्त केली. चक्रीवादळ अम्फानमुळे पश्चिम बंगालमधील विध्वंसाची दृश्ये पहात आहे. या आव्हानात्मक काळात संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधान म्हणाले

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करत, सरकारने देशातील आरोग्यसुविधांचा झपाट्याने विस्तार केला आहे. आतापर्यंत देशभरात, कोविडचे 45299 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 40.32%.इतका आहे. 21 मे 2020 पर्यंत 26,15,920 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. गेल्या 24 तासांत 555 प्रयोगशाळांमध्ये (391 सरकारी आणि 164 खाजगी प्रयोगशाळा) 103532 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. नवी दिल्लीतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, ICMR,आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र या सर्वांनी राज्यांच्या आरोग्य विभाग तसेच जागतिक आरोग्य संघटनेसारख्या हितसंबंधी संस्थांशी समन्वय ठेवत, समुदाय-आधारित सिरो-सर्व्हे म्हणजेच नमुने-चाचणी सर्वेक्षण करत आहे, ज्याद्वारे भारतीयांमध्ये सार्स-कोविड-2 चा संसर्ग किती प्रमाणात आहे, याचा अंदाज घेता येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांतून 3027 समर्पित कोविड रुग्णालये आणि कोविड आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच, 7013 कोविड केअर सेन्टर्स देखील तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय, कोविड समर्पित रुग्णालये आणि कोविड आरोग्य केंद्रात 2.81 लाख पेक्षा जास्त अलगीकरण खाटा, 31,250 अतिदक्षता खाटा आणि 11387 ऑक्सिजन सुविधा युक्त खाटा सज्ज असून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यासोबतच, भारत सरकारने 65.0 लाख पीपीई सूट्स आणि 101.07 लाख N95 मास्कचा पुरवठा विविध राज्यांना केला आहे. याआधी आपल्या देशात, PPE सूट्स किंवा N95 मास्कचे उत्पादन होत नव्हते, मात्र, आता दररोज सुमारे 3 लाख PPE सूट्स आणि 3 लाख N95 मास्कचे देशातच उत्पादन होत आहे.

गेल्या 24 तासात, एकूण 3,002 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने सुधारत असून सध्या ते 40.32% इतके आहे. भारतात सध्या कोविडचे 63,624 सक्रीय रुग्ण असून या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहे. एकूण सक्रीय रूग्णांपैकी सुमारे 2.94% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. सध्या भारतात कोविडचा मृत्यूदर 3.06% इतका आहे. जागतिक स्तरावरील मृत्यूदर 6.65%. इतका असून भारतात त्या तुलनेत मृत्यूदर बराच कमी आहे. वेळेत रुग्ण ओळखून त्याच्यावर सुनियोजित वैद्यकीय उपचार करण्याच्या भारताच्या धोरणामुळेच मृत्यूदर आटोक्यात राहिला आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी: https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

इतर अपडेट्स:

 

 

  • कोविड-19 च्या काळात आर्थिक जबाबदारीचा भाग म्हणून, भारत सरकारने दारिद्रय रेषेखालील जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेपी), या योजनेअंतर्गत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने 8 कोटी पीएमयूवाय लाभार्थ्यांना एप्रिल 2020 मध्ये 1.4.2020 पासून 3 महिन्यांसाठी एलपीजी सिलिंडर्स विनामूल्य पुरवित आहे. तेल विपणन कंपन्यांकडून (ओएमसी) पीएमजीकेपी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 20.05.20 पर्यंत 453.02 लाख सिलिंडर वितरित करण्यात आले, तेल विपणन कंपन्यांनी योजनेअंतर्गत एकूण 679.92 सिलिंडर पीएमयूवाय लाभार्थ्यांना वितरित केले आहेत.

 

  • एका अनोख्या उपक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उद्या म्हणजेच 22 मे 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता देशातील कम्युनिटी रेडिओशी संवाद साधणार आहेत. एकाच वेळी देशातील सर्व कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.ही चर्चा हिंदी आणि इंग्रजी या दोन विभागांत प्रसारित केली जाईल. श्रोते एफएम गोल्ड (100.1 MHz) वर हिंदीमध्ये सायंकाळी 7:30 वाजता आणि इंग्रजीत रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी हा कार्यक्रम ऐकू शकतात. कोविडशी संबंधित संवादासाठी सरकार देशातील सर्व विभागांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. देशात सुमारे 290 कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहेत आणि एकत्रितपणे ते तळागाळातील लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करतात. भारतातील दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या शक्तीचा उपयोग करण्याच्या उद्देशाने ही चर्चा आयोजित केली आहे.

 

  • केंद्र सरकारचा उद्योग क्षेत्रावर पूर्ण आणि व्यापक विश्वास आहे असे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी भर देऊन सांगितले. उद्योग क्षेत्राने अधिक व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारत आणि कौशल्याला वाव देत कामगारांना काम देण्याचा आराखडा आखावा असे आवाहन त्यांनी उद्योग जगताला केले. सर्वांना स्वीकारार्ह अशा पद्धतीने कामगारांना काम देण्याची मानसिकता ठेऊन उद्योग जगताने आदर्श निर्माण करावा असे त्यांनी सांगितले. 2020 मधे स्थापनेला 125 वर्षे पूर्ण होणाऱ्या सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाशी वित्त मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल गौरव करत, देशाच्या विकासात सीआयआयने महत्वाची भूमिका बजावली आहे. सीआयआयच्या सदस्यांनी त्यांच्या क्षेत्रात ठोस कामगिरी केल्याचे त्या म्हणाल्या.

 

 

  • गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, यात्रेकरी, पर्यटक विद्यार्थी आणि इतरांना आपापल्या ठिकाणी पोचते करण्यासाठी दि. 1 मे 2020 पासून भारतीय रेल्वेने या श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. 20 मे 2020 (सकाळी 10 वाजेपर्यंत) देशातल्या विविध राज्यांत एकूण 1773 गाड्या चालवल्या गेल्या. या श्रमिक स्पेशल गाड्यातून 23.5 लाखांपेक्षा जास्त प्रवासी आपापल्या राज्यात पोचले आहेत.

 

  • अलिप्त राष्ट्र चळवळ गटांच्या (NAM) आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. अझरबैजानचे आरोग्यमंत्री ओग्ते शिरालीयेव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.संपूर्ण जगात कोविड-19 या साथीच्या आजाराने थैमान घातले असतांना आणि जगभरातील नागरिक तसेच त्यांच्या रोजगारावर या आजाराचे विपरीत परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ही नाम परिषद आयोजित करण्यात आली होती. कोविड-19 च्या रूपाने जगासमोर उभे राहिलेल्या संकटाबद्दल सर्व सदस्यांनी चिंता व्यक्त केली आणि सुनियोजित तयारी, प्रतिबंधक उपाययोजना, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक समन्वय साधून एकत्रितपणे या आजाराचा सामना करण्याचा निश्चय सर्व सदस्यांनी व्यक्त केला.

 

  • चेहऱ्याला लावण्याचे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले खादी मास्क "परदेशी बाजारपेठेत" जाण्यासाठी तयार आहेत. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सर्व प्रकारच्या नॉन-मेडिकल / नॉन-सर्जिकल मास्कच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर खादी व ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) आता खादी कॉटन आणि खादी सिल्कचे फेस मास्क परदेशात निर्यात करण्याची शक्यता पडताळून पाहील

 

 

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून IGNOU म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन पदव्युत्तर हिंदी अभ्यासक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या अभ्यासक्रमामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘पढे इंडिया ऑनलाईन’ उपक्रमाला अधिक बळकटी मिळाली असल्याचे सांगत ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या इग्नूच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रात कोविडचे 2250 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे ऐकू रुग्णसंख्या 39,297 इतकी झाली आहे. ताज्या अहवालानुसार राज्यात 27,581 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत 1372 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 23,935 इतकी झाली आहे. मुंबईतील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुंबईतल्या सर्व 24 वॉर्डमधील खाजगी नर्सिंग होम आणि लहान रुग्णालयांमध्ये 10 आयसीयूंसह किमान 100 खाटा सज्ज ठेवण्याचे निर्देश महानगरपालिकेनं आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजराज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत केले.

 

RT/ST/PM

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625857) Visitor Counter : 313