केंद्रीय लोकसेवा आयोग

5 जूननंतर जाहीर होणार युपीएससी परीक्षांचे नवे वेळापत्रक

Posted On: 20 MAY 2020 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  मे 2020

कोविड-19 मुळे जारी केलेल्या देशव्यापी निर्बंधाच्या तिसऱ्या टप्प्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज एक विशेष बैठक आयोजित केली होती. अनेक निर्बंध अजूनही कायम असल्याने, सद्यस्थितीत परीक्षा व मुलाखती पुन्हा सुरु करणे शक्य नाही, असा निर्णय आयोगाने घेतला आहे.

तथापि, केंद्र सरकार व विविध राज्यांनी जाहीर केलेल्या काही शिथिलतांची आयोगाने दखल घेतली असून टाळेबंदीच्या चौथ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुढे ढकलण्यात आलेल्या विविध परीक्षा व मुलाखतींच्या उमेदवारांना काही स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने, आयोग 5 जून, 2020 रोजी होणाऱ्या बैठकीत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी करेल. 5 जून 2020 रोजी आयोगाच्या बैठकीनंतर परीक्षांच्या नवीन दिनदर्शिकेचा/वेळापत्रकाचा तपशील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

 

 

S.Pophale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1625687) Visitor Counter : 112