पंतप्रधान कार्यालय

देश पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे -पंतप्रधान

Posted On: 21 MAY 2020 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

 

अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाची दृश्ये पाहून पंतप्रधानांनी पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये  लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल अशी इच्छा व्यक्त केली.

ट्वीटच्या माध्यमातून  ते म्हणाले, माझ्या भावना ओदिशाच्या जनतेबरोबर आहेत. राज्य मोठ्या धैर्याने  अम्फान चक्रीवादळाच्या परिणामांना सामोरे जात आहे.  पीडितांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी प्रशासन प्रत्यक्ष काम करत आहे. मी प्रार्थना करतो की परिस्थिती लवकरच सामान्य होईल.

चक्रीवादळचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष  ठेवून आहेत आणि पश्चिम बंगाल सरकारशी समन्वयाने काम करत आहेत.

पीडितांना मदत करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही.

चक्रीवादळ अम्फानमुळे पश्चिम बंगालमधील  विध्वंसाची  दृश्ये पहात आहे. या आव्हानात्मक काळात  संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625778) Visitor Counter : 215