रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या "श्रमिक स्पेशल " गाड्यांमधून २० दिवसात २३.५ लाख  प्रवाशांना आपापल्या राज्यात पोहोचवले


भारतीय रेल्वेने २० मे २०२० पर्यंत  १७७३ श्रमिक स्पेशल गाड्या देशभरात चालवल्या

एका दिवसात २०५ श्रमिक स्पेशल गाड्यांतून  विक्रमी २.५ लाख प्रवासी घरी

Posted On: 20 MAY 2020 10:56PM by PIB Mumbai

 

गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, यात्रेकरी, पर्यटक विद्यार्थी आणि इतरांना आपापल्या ठिकाणी पोचते करण्यासाठी  दि. १ मे २०२० पासून भारतीय रेल्वेने या श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.

आज दि.२०मे २०२० (सकाळी १० वाजेपर्यंत) देशातल्या विविध राज्यांत एकूण १७७३  गाड्या चालवल्या गेल्या. या “श्रमिक स्पेशल” गाड्यातून २३.५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी आपापल्या राज्यात पोचले आहेत.

कालच्या एका दिवसात म्हणजे  दि.१९ मे २०२०रोजी एकाच दिवशी देशातल्या विविध राज्यांत एकूण २०५  गाड्या चालवून त्यातून २.५ लाख प्रवाशांना आपापल्या राज्यांत पोहोचवून एक विक्रम केला गेला.

या १७७३ गाड्या, आंध्रप्रदेश, बिहार, चंदिगड(कें.प्र.), दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पुदूचेरी(कें.प्र.), पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांतून सोडण्यात आल्या. तसेच या श्रमिक स्पेशल गाड्या आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, ओरिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलगंणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात परतल्या.

सर्व प्रवाशांचे गाडीत चढण्यापूर्वी स्क्रिनींग केले जात आहे. प्रवाशांना गाडीत मोफत जेवण आणि पाणी पुरवले जात आहे.

 

M.Chopade/S. Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625589) Visitor Counter : 225