गृह मंत्रालय
एनसीएमसीने ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या चक्रीवादळग्रस्त भागातील बचाव आणि मदत कार्याचा घेतला आढावा
Posted On:
21 MAY 2020 1:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2020
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (एनसीएमसी) बैठकीत संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये/ संस्थासमवेत अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील प्रभावित भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
दिशा आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी माहिती दिली की हवामानशास्त्र विभागाने वेळेवर आणि अचूक वर्तवलेला अंदाज आणि एनडीआरएफच्या तुकड्या आधीच तैनात करण्यात आल्यामुळे पश्चिम बंगालमधील सुमारे 5 लाख लोक आणि ओदिशातील सुमारे २ लाख लोकांची सुखरूप सुटका करण्यात मदत झाली. 1999 मध्ये ओदिशात मोठ्या प्रमाणावर विनाश करणाऱ्या सुपर चक्रीवादळाच्या खालोखाल अम्फान चक्रीवादळाची तीव्रता होती हे लक्षात घेतले तर अम्फानमुळे कमीतकमी जीवितहानी झाली आहे.
एनडीआरएफ पश्चिम बंगालमध्ये विशेषत: कोलकातामध्ये स्थिती पूर्ववत करण्याच्या कामाला गती देण्यासाठी अतिरिक्त तुकड्या तैनात करत आहे. भारतीय अन्न महामंडळ पश्चिम बंगालमध्ये अन्नधान्य, विशेषत:तांदुळाची पुरेशी उपलब्धता देखील सुनिश्चित करेल जेणेकरून अडकलेल्या लोकांना त्वरित अन्न पुरवता येईल.
उर्जा मंत्रालय आणि दूरसंचार विभाग हे दोन्ही राज्यांमधील सेवा पूर्ववत सुरू करण्यात मदत करेल. पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालेल्या रेल्वेने लवकरात लवकर आपले कामकाज सुरू करण्या साठी प्रयत्न सुरू केले आहे.
चक्रीवादळ प्रभावित भागात शेती, वीज आणि दूरसंचार सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पश्चिम बंगालने दिली. ओदिशाने माहिती दिली की नुकसान प्रामुख्याने शेतीपुरते मर्यादित आहे.
बचाव आणि पुनर्बांधणी प्रयत्नांचा आढावा घेतांना कॅबिनेट सचिवांनी निर्देश दिले की केंद्रीय मंत्रालये / संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ओदिशा आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारांच्या संपर्कात रहावे आणि आवश्यक ती मदत त्वरित उपलब्ध करुन द्यावी. गृह मंत्रालय नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासाठी पथके पाठवणार असून ते अहवाल सादर करतील.
पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एनसीएमसी बैठकीत भाग घेतला. गृह, संरक्षण, नौवहन , नागरी उड्डाण , रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, दूरसंचार, स्टील, पेयजल आणि स्वच्छता, आरोग्य मंत्रालय तसेच आयएमडी, एनडीएमए आणि एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625727)
Visitor Counter : 245
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam