PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
24 SEP 2020 7:51PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 24 सप्टेंबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे 26 सप्टेंबर 2020 रोजी आभासी द्विपक्षीय शिखर परिषद घेणार आहेत.
कोविड प्रादुर्भावाचे आधिक्य असणाऱ्या सात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या आभासी माध्यमातील बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णांची संख्या बरे झालेल्या नवीन रुग्णांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.
देशात गेल्या 24 तासात 86,508 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 75 टक्के नवीन रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्र सर्वोच्च स्थानावर कायम आहे. केवळ महाराष्ट्रात 21,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण असून आंध्रप्रदेश मध्ये 7,000 पेक्षा जास्त तर कर्नाटकमध्ये 6,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासात 1,129 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 80 टक्के मृत्यू हे दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात 479, उत्तरप्रदेशमध्ये 87 तर पंजाबमध्ये 64 मृत्यूंची नोंद झाली.
भारताने देशातील कोविड चाचणीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. देशात 1810 प्रयोगशाळा सून यामध्ये 1082 सरकारी आणि 728 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 11,56,569 चाचण्या घेण्यात आल्या असून एकूण चाचण्यांच्या संख्येने 6.74 कोटींचा आकडा पार केला आहे.
लक्ष्य केंद्रित धोरण आणि प्रभावी लोककेंद्रित उपाययोजना यामुळे भारतात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. भारतात सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे.
प्रभावी चाचण्या, शोध, उपचार, सर्वेक्षण आणि सुस्पष्ट संदेश याचा हा परिणाम असून पंतप्रधानांनी काल सात राज्य/केंद्रशासित प्रदेशांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत यावर भर दिला.
गेल्या 24 तासात देशात 87,374 इतके रुग्ण बरे झाले तर एकूण 86,508 जणांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 46.7 (46,74,987) लाख इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याच्या दराने 81.55 टक्क्यांचा आकडा पार केला आहे.
नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत वाढत आहे.
बरे झालेले रुग्ण (46,74,987) सक्रिय (9,66,382) रुग्णांपेक्षा 37 लाखांनी जास्त आहे. तसेच सक्रिय रुग्णसंख्या एकूण बाधित रुग्णांच्या 16.86 टक्के इतकी आहे. सक्रिय रुग्णसंख्येत हळूहळू घट दिसून येत आहे.
राष्ट्रीय स्तरानंतर 13 राज्यातही नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 74 टक्के 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्राने 19476 प्रकारणांसह (22.3%) सलग सहाव्या दिवशी हे प्रमाण कायम ठेवले आहे.
'चेस द व्हायरस''चा पाठपुरावा करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या केंद्राच्या नेतृत्त्वातील कृतीशील धोरणाद्वारे हे शक्य झाले आहे. केंद्राने जारी केलेल्या स्टँडर्ड ऑफ केअर प्रोटोकॉलच्या माध्यमातून उच्च गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेद्वारे जास्तीत जास्त चाचण्या, त्वरित निरीक्षण आणि ट्रॅकिंगद्वारे लवकरात लवकर रुग्ण शोधत आल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
केंद्र आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांचे रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी वैद्यकीय उपचार, गृह अलगीकरणावरील लक्ष, स्टिरॉइड्सचा वावर, अँटिकोआगुलंट्सचा वापर आणि त्वरित आणि वेळेवर उपचार याकरीता रूग्णांसाठी रुग्णवाहिकांच्या सुधारित सेवा यावर सतत लक्ष केंद्रित केले गेले आहे. आशा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गृह अलगीकरणामधील प्रभावी देखरेखीचा व रुग्णांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यात आला आहे.
‘ईसंजीवनी’ डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून टेलिमेडिसिन सेवा, कोविडचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरल्या आहेत, त्याचबरोबर कोविड नसलेल्या अत्यावश्यक आरोग्य सेवाही उपलब्ध होत आहे. आयसीयूमधील डॉक्टरांच्या क्लिनिकल मॅनेजमेंट क्षमता वाढवण्यावर केंद्राचा भर आहे. एम्स, नवी दिल्लीच्या तज्ञांनी घेतलेल्या ‘नॅशनल ई-आयसीयू ऑन कोविड-19 मॅनेजमेंट’ उपक्रमामुळे यामध्ये भरीव मदत झाली आहे. 28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात 278 संस्था आणि उत्कृष्टता केंद्रांमध्ये अशी 20 सत्रे घेण्यात आली आहेत.
इतर अपडेट्स:
- केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी यांनी पावसाळी अधिवेशनाबाबत आज नवी दिल्लीत दिलेल्या निवेदनात सांगितले की, लोकसभेची उत्पादकता सुमारे 167 टक्के तर राज्यसभेची अंदाजे 100.47 टक्के होती. जोशी म्हणाले की, 14 सप्टेंबर, 2020 रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन 1 ऑक्टोबर, 2020 रोजी संपणार होते, मात्र कोविड-19 महामारीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामकाज पार पडल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज बुधवारी, 23 सप्टेंबर, 2020 रोजी संस्थगित करण्यात आले. मागील 10 दिवसांमध्ये 10 बैठका झाल्या.
- प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-एसव्हीनिधी) योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त जणांकडून कर्जासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 5.5 लाखांपेक्षा जास्त जणांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. जवळपास दोन लाख जणांना कर्जांचे वितरण करण्यात आले आहे. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाच्यावतीने कोविड-19 टाळेबंदीनंतर 50 लाख पथ विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करता यावेत यासाठी तारण मुक्त खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करीत आहे.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांचे सभासद, संयुक्त राष्ट्रसंघ संस्थांचे प्रमुख आणि प्रतिनिधी आणि भागीदारी संस्था यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधला. त्यांनी भारताची क्षयरोग उच्चाटनाच्या दिशेने, विशेषतः कोविड-19 संकटात भारताची भूमिका आणि योगदान याबाबत ते बोलले.
- कोविड-19 साठी व्हेंटिलेटर्सची खरेदी : भारत सरकारने जानेवारी 2020 पासून आजपर्यंत अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर दिल्या आहेत
- जागतिक आरोग्य संघटनेने प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे प्रतिदिन 1000 नमुना चाचणी किंवा 140 चाचण्यांची शिफारस केली आहे. 19 सप्टेंबर 2020 रोजी भारतात प्रतिदिन प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे 875 या दराने कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीपेक्षा हे प्रमाण सहापटीने अधिक आहे. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण प्रतिदिन प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे 1145 चाचण्या एवढे आहे.
- भारताच्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ( 51वा इफ्फी)यंदा गोवा येथे दि. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते. मात्र हा महोत्सव आता पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन कार्यक्रमानुसार आता दि. 16 ते 24 जानेवारी, 2021 या काळामध्ये हा चित्रपट महोत्सव भरविण्यात येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
- गोवा टपाल विभागाने राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. 09 ऑक्टोबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 दरम्यान टपाल सप्ताह साजरा केला जाणार आहे. पत्रलेखन स्पर्धा केवळ गोवा विभागापुरती मर्यादीत आहे. ‘पोस्टमन- आपला कोविड योद्धा’ हा पत्रलेखन स्पर्धेसाठी विषय आहे. ही स्पर्धा 18 वर्षांखालील वयोगटासाठी आहे.
- 'आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PMJAY)' सुरु झाल्यापासून त्याअंतर्गत, 21.09.2020 पर्यंत 1.26 कोटीपेक्षा अधिक रुग्णांचे रुग्णालयातील प्रवेश अधिकृतरीत्या संमत करण्यात आले आहेत. यापैकी 5.13 लाख रुग्णांची रुग्णालय भर्ती प्रक्रिया, कोविड-19 च्या तपासणी आणि उपचारांसाठी अधिकृतरीत्या संमत करण्यात आली आहे.
- दर वर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. पौगंडावस्था, गर्भवती आणि स्तनदा माता आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी पंतप्रधानाच्या संपूर्ण पोषणाच्या पोषण अभियान 2018 अंतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी हा महिना साजरा केला जातो.
- ‘यूपीएससी’ म्हणजेच केंद्रीय लोक सेवा आयोगाने भर्तीसाठी जुलै आणि ऑगस्ट, 2020मधील अंतिम निकाल जाहीर केले आहेत. नियुक्तीसाठी ज्या उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात आली आहे, त्यांना स्वतंत्रपणे टपालाने त्यांचे निकाल कळविण्यात आले आहेत.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या थेट संपर्क मोहिमेमुळे राज्यात कोविड-19 विरूद्धचा लढा आणखी मजबूत होईल. राज्यात आजपर्यंत 2.73 लाखांहून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यभरातील 2.25 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी 59 हजार आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कोविड -19 विषयी जनजागृती करण्याबरोबरच, मोहिमेमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येण्याबाबत विचार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी झालेल्या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.
M.C/S.T/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658792)
Visitor Counter : 241