आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रतीदशलक्ष लोकसंख्येमागे1000 नमुना चाचण्यांची  जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस

Posted On: 23 SEP 2020 9:14PM by PIB Mumbai

 

जागतिक आरोग्य संघटनेने प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे प्रतिदिन 1000 नमुना चाचणी किंवा 140 चाचण्यांची शिफारस केली आहे. 19 सप्टेंबर 2020 रोजी भारतात प्रतिदिन प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे 875 या दराने कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीपेक्षा हे प्रमाण सहापटीने अधिक आहे. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण प्रतिदिन प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे 1145 चाचण्या एवढे आहे. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 4 सप्टेंबर 2020 रोजी जारी केलेल्या नियमावलीत मागणी करताक्षणी (ऑन डिमांड) चाचणीची परवानगी दिली आहे. कोविड-19 चाचणी सर्वांना सहजरित्या उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करणे आणि बिगर वैद्यकीय कर्मचारी आणि फिल्ड वर्कर्स जे देखरेख, पूरक सेवांमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी डिओपीटीच्या आयगोट-दीक्षा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर (https://igot.gov.in/igot/  कार्यप्रणाली (मोड्यूल्स) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे मोड्यूल्स स्थानिक भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आले आहेत. या अंतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी 29.24 लाख नोंदणी झाली आहे. यात 5,699  डॉक्टर्स, 5,699 आयुष प्रोफेशनल्स, 4,102 नर्स, 963 संलग्न आरोग्य कर्मचारी, 5,881 आघाडीवरील कर्मचारी, 2,70,835 स्वयंसेवक आणि 25,77,522 सहभागितांचा समावेश आहे. आयगोट-दीक्षा प्लॅटफॉर्मवर सुमारे 18.96 लाख अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण संसाधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.            

*****

B.Gokhale/ S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1658381) Visitor Counter : 197