ग्रामीण विकास मंत्रालय

राष्ट्रीय पोषण मास 2020 मध्ये देशभरात आरोग्य आणि पोषणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी बचत गट आणि दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या महासंघांचा सक्रिय सहभाग

Posted On: 24 SEP 2020 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर  2020

दर वर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. पौगंडावस्था, गर्भवती आणि स्तनदा माता आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी पंतप्रधानाच्या संपूर्ण पोषणाच्या पोषण अभियान 2018 अंतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी हा महिना साजरा केला जातो. 

या वर्षीचा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्यांच्या संस्थांना आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. 7 सप्टेंबर 2020 रोजी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या संस्थांसोबत पोषण महिन्यात होणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा आणि नियोजन करण्यासाठी एका व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. पोषण महिन्याच्या राष्ट्रीय संकल्पनेला अनुसरून म्हणजेच जास्त प्रमाणात कुपोषित असलेल्या बालकांचा शोध घेणे आणि किचन गार्डनला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबवणे यासाठी राज्यांच्या संस्थांकडून खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

  1. ज्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल आहे अशा ठिकाणी बचत गट आणि त्यांच्या महासंघांचा सक्रिय सहभाग आणि कोविड-19 च्या मार्गदर्शक नियमावलीनुसार सुरक्षित अंतराचे पालन, मास्क परिधान करणे आणि हात धुणे आणि किंवा सॅनिटायजरचा वापर करणे.
  2. बचत गट आणि त्यांच्या महासंघांच्या सामुदायिक बैठकांचे आयोजन करणे आणि त्यात स्तनपान, पूरक आहार भरवणे, कोविड-19 च्या काळात 0-24 या वयोगटातील बालकांमधील रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी त्यांच्यातील अती जास्त कुपोषणाची समस्या वेळेवर लक्षात घेणे, पोषण-वाटिकांना प्रोत्साहन आणि राज्यांशी संबंधित इतर मुद्दे यावर भर देत मार्गदर्शन करणे.
  3. आरोग्य विभाग, महिला आणि बाल विकास विभाग आणि इतर विभागांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चा, महत्त्वाच्या विषयांवरील वेबिनार इत्यादींमध्ये समुदायाच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो.
  4. बचतगट सदस्यांच्या घरांमध्ये पोषण-वाटिकांना प्रोत्साहन आणि मनरेगाला अनुसरून एका मोहिमेच्या स्वरुपात त्याबाबतची जागरुकता निर्माण करणे .
  5. दैनंदिन व्यवहारांच्या वेळी साबणाने हात धुण्याला, मास्कच्या वापराला आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याला प्रोत्साहन.
  6. महत्त्वाचे संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हाटसऍप सारख्या तंत्रज्ञानविषयक माध्यमांचा वापर आणि दृक-श्राव्य सामग्रीची देवाणघेवाण करण्यासाठी ऑनलाईन मंचाचा आणि ट्वीटर/ फेसबुक सारख्या इतर समाज माध्यमांचा वापर.

राष्ट्रीय मिशनचे मार्गदर्शन आणि पाठबळाद्वारे राज्यांमधील सर्व संस्था पूर्ण क्षमतेने आणि कोविड-19च्या नियमांनुसार पोषण महिन्यातील उपक्रम राबवत आहेत. वेबिनार, पोषण रॅली, पोषण रांगोळ्या, पोषण संकल्प, पाककला स्पर्धा, जागरुकता, पोषण वाटिकांना प्रोत्साहन, सामुदायिक बैठका यांसारखे उपक्रम त्यात समाविष्ट आहेत. राज्यांच्या संस्था आणि समुदाय त्यात सक्रिय सहभाग घेत आहेत आणि आरोग्य, पोषण, स्वच्छता इत्यादी संदेशांना अधिक चांगल्या प्रकारे प्रसारित करण्याची ही संधी साध्य करत आहेत.

2016 मध्ये दशसूत्री धोरणाचा अंगिकार करताना, अन्न, पोषण, आरोग्य आणि धुणे यांचे एकात्मिकरण दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन( डीएवाय- एनआरएलएम) चा एकात्मिक भाग बनले आहे. आरोग्य, पोषण, स्वच्छता इत्यादींची स्थिती सुधारण्यासाठी डीएवाय- एनआरएलएम अंतर्गत बचत गटांचे सदस्य या मुद्यांचे एकात्मिकरण करण्यासाठी निवडक भागांमध्ये विविध उपक्रम हाती घेत आहेत. तसेच पोषण अभियानाला पाठबळ देण्यासाठी आणि वर्तनात्मक बदल घडवण्यासाठी पोषण महिना आणि पोषण पंधरवडा यांसारख्या उपक्रमांमध्ये राज्यांमधील संस्था त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.

राष्ट्रीय पोषण महिन्यासारख्या कार्यक्रमांमुळे डीएवाय- एनआरएलएम ला गतिमान करण्याची संधी उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे ज्यांना या योजनांचे लाभ देण्याचा उद्देश आहे त्यांच्यापर्यंत महत्त्वाची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचत आहे.

पोषण महिना 2019 च्या काळात 11.39 लाख उपक्रम हाती घेण्यात आले होते आणि त्यात 16.39 कोटी लोकांचा सहभाग (जन आंदोलन पोर्टलनुसार) होता. पोषण अभियानाचे प्रमुख मंत्रालय असलेल्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या समन्वयाने सध्याचा पोषण महिना 2020 हाती घेण्यात आला आहे.

राज्यांना कोविड-19 प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे आणि महत्त्वाचे संदेश प्रसारित करण्यासाठी आणि बचत गट आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

योजना राबवण्यासाठी योग्य असलेली प्रमुख व्यक्ती, विकसित कृती योजना, निर्धारित उपक्रम, जिल्ह्यांना आणि तालुक्यांना मार्गदर्शन करण्याचे काम राज्यांच्या संस्था करत आहेत आणि पोषण महिन्यातील उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी  योग्य प्रकारचे नियोजन आणि समन्वयासाठी विविध विभागांशी विविध पातळ्यांवर संपर्क राखत आहेत.

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658682) Visitor Counter : 914