आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त


13 राज्यात नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 74 टक्के 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील

Posted On: 24 SEP 2020 1:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर  2020

 

लक्ष्य केंद्रित धोरण आणि प्रभावी लोककेंद्रित उपाययोजना यामुळे भारतात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. भारतात सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे.

प्रभावी चाचण्या, शोध, उपचार, सर्वेक्षण आणि सुस्पष्ट संदेश याचा हा परिणाम असून पंतप्रधानांनी काल सात राज्य/केंद्रशासित प्रदेशांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत यावर भर दिला.

गेल्या 24 तासात देशात 87,374 इतके रुग्ण बरे झाले तर एकूण 86,508 जणांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 46.7 ((46,74,987) लाख इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याच्या दराने 81.55 टक्क्यांचा आकडा पार केला आहे.

नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत वाढत आहे.

बरे झालेले रुग्ण (46,74,987) सक्रिय (9,66,382) रुग्णांपेक्षा 37 लाखांनी जास्त आहे. तसेच सक्रिय रुग्णसंख्या एकूण बाधित रुग्णांच्या 16.86 टक्के इतकी आहे. सक्रिय रुग्णसंख्येत हळूहळू घट दिसून येत आहे.

राष्ट्रीय स्तरानंतर 13 राज्यातही नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 74 टक्के 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्राने 19476 प्रकारणांसह (22.3%) सलग सहाव्या दिवशी हे प्रमाण कायम ठेवले आहे.

'चेस द व्हायरस''चा पाठपुरावा करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या केंद्राच्या नेतृत्त्वातील कृतीशील धोरणाद्वारे हे शक्य झाले आहे. केंद्राने जारी केलेल्या स्टँडर्ड ऑफ केअर प्रोटोकॉलच्या माध्यमातून उच्च गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेद्वारे जास्तीत जास्त चाचण्या, त्वरित निरीक्षण आणि ट्रॅकिंगद्वारे लवकरात लवकर रुग्ण शोधत आल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

केंद्र आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांचे रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी वैद्यकीय उपचार, गृह अलगीकरणावरील लक्ष, स्टिरॉइड्सचा वावर, अँटिकोआगुलंट्सचा वापर आणि त्वरित आणि वेळेवर उपचार याकरीता रूग्णांसाठी रुग्णवाहिकांच्या सुधारित सेवा यावर सतत लक्ष केंद्रित केले गेले आहे. आशा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गृह अलगीकरणामधील प्रभावी देखरेखीचा व रुग्णांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यात आला आहे.

‘ईसंजीवनी’ डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून टेलिमेडिसिन सेवा, कोविडचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरल्या आहेत, त्याचबरोबर कोविड नसलेल्या अत्यावश्यक आरोग्य सेवाही उपलब्ध होत आहे. आयसीयूमधील डॉक्टरांच्या क्लिनिकल मॅनेजमेंट क्षमता वाढवण्यावर केंद्राचा भर आहे. एम्स, नवी दिल्लीच्या तज्ञांनी घेतलेल्या नॅशनल ई-आयसीयू ऑन कोविड-19 मॅनेजमेंट उपक्रमामुळे यामध्ये भरीव मदत झाली आहे. 28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात 278 संस्था आणि उत्कृष्टता केंद्रांमध्ये अशी 20 सत्रे घेण्यात आली आहेत. 

 

U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1658607) Visitor Counter : 159