आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड ताजी माहिती
नवीन रुग्णांपैकी 75 टक्के नवीन कोविड रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशात
Posted On:
24 SEP 2020 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2020
सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णांची संख्या बरे झालेल्या नवीन रुग्णांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.
देशात गेल्या 24 तासात 86,508 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 75 टक्के नवीन रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्र सर्वोच्च स्थानावर कायम आहे. केवळ महाराष्ट्रात 21,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण असून आंध्रप्रदेश मध्ये 7,000 पेक्षा जास्त तर कर्नाटकमध्ये 6,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासात 1,129 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 80 टक्के मृत्यू हे दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात 479, उत्तरप्रदेशमध्ये 87 तर पंजाबमध्ये 64 मृत्यूंची नोंद झाली.

भारताने देशातील कोविड चाचणीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. देशात 1810 प्रयोगशाळा सून यामध्ये 1082 सरकारी आणि 728 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 11,56,569 चाचण्या घेण्यात आल्या असून एकूण चाचण्यांच्या संख्येने 6.74 कोटींचा आकडा पार केला आहे.

M.Chopade/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658692)
Visitor Counter : 206
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam