पंतप्रधान कार्यालय
भारत आणि श्रीलंका दरम्यान आभासी द्विपक्षीय परिषद
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2020 1:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे 26 सप्टेंबर 2020 रोजी आभासी द्विपक्षीय शिखर परिषद घेणार आहेत.
श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकांनंतर आणि दोन्ही देशांच्या कसोटीच्या काळातील मैत्रीपूर्ण संबंधांच्या संदर्भात द्विपक्षीय संबंधांच्या विस्तृत आराखड्याचा सर्वंकष आढावा घेण्याची संधी ही द्विपक्षीय शिखर परिषद दोन्ही नेत्यांना देईल.
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ते “द्विपक्षीय संबंधांचा सर्वांगीणदृष्ट्या संयुक्तपणे आढावा घेण्यास उत्सुक आहेत”.
ते म्हणाले, “कोविडनंतरच्या काळात आपले सहकार्य आणखी वाढविण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजेत.”
U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1658613)
आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam