Posted On:
11 SEP 2020 8:20PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 11 सप्टेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी 2020 अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे 21 व्या शतकातील भारताला नवी दिशा मिळणार आहे आणि देशाच्या भवितव्याची इमारत उभी करणासाठीच्या पायाभरणी सोहळ्याचे आपण घटक आहोत. ते म्हणाले की, या तीन दशकांत आपल्या जीवनातील कोणतीही बाब तीच राहिली नाही, पण अद्याप आपली शिक्षण व्यवस्था जुन्या व्यवस्थेप्रमाणे चालत आहे. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे नवभारताच्या आकांक्षांची पूर्ती करणे, नव्या संधी निर्माण करणे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 सप्टेंबरला, मध्यप्रदेशात होणाऱ्या ‘गृहप्रवेशम’ कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून सहभागी होणार असून, पंतप्रधान आवसा योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 1.75 लाख घरांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ही सर्व घरे कोविड संसर्गाच्या आव्हानात्मक काळात बांधण्यात/पूर्ण करण्यात आली आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 70,880 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 14,000 तर आंध्रप्रदेश मधील 10,000 रुग्णांचा समावेश आहे.
यामुळे आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35,42,663 इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर 77.65 टक्के इतका झाला आहे.
नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधून नोंदवले गेले आहेत.
गेल्या 24 तासात 96,551 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रातील 23,000 हून अधिक तर आंध्रप्रदेशातील 10,000 हून अधिक रुग्ण आहेत.
सुमारे 57 टक्के नवीन रुग्ण केवळ पाच राज्यातून आढळून आले आहेत. बरे झाले 60 टक्के रुग्ण याच राज्यातील आहेत.
देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 9,43,480 इतकी आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून महाराष्ट्रात 2,60,000 हून अधिक तर त्यापाठोपाठ कर्नाटकात 1,00,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74 टक्के सक्रिय रुग्ण जास्त प्रभावित झालेल्या नऊ राज्यातील आहेत. एकूण सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचे प्रमाण 48% पेक्षा जास्त आहे.
देशभरात गेल्या 24 तासांत 1,209 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 495 मृत्यू तर कर्नाटकमध्ये 129 मृत्यू तर उत्तर प्रदेशात 94 मृत्यूची नोंद झाली आहे.
इतर अपडेट्स:
राज्यांमधील वैद्यकीय ऑक्सिजनच्या दळणवळणावर कोणतेही बंधन घालू नये, असे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे राज्य / केंद्रशासित प्रदेशांना निवेदन : केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काही अधिनियमांतर्गत तरतूदींचा उपयोग करून ऑक्सिजन पुरवठ्याची आंतरराज्यीय वाहतूक रोखण्याचा प्रयत्न काही राज्य करीत आहेत, असे लक्षात आले आहे आणि राज्यात असलेल्या उत्पादकांना / पुरवठादारांना ऑक्सिजनचा पुरवठा केवळ राज्यातील रुग्णालयांपुरताच मर्यादित ठेवण्यास सांगण्यात येत आहे, असे लक्षात आले. ही बाब लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने कोविडमधील अत्यवस्थ रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व पुन्हा सांगितले आहे. केंद्रिय आरोग्य सचिवांना राज्य / केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात यावर भर दिला आहे की, कोविड – 19 च्या मध्यम आणि गंभीर प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा आणि अखंडित पुरवठा करणे ही एक महत्त्वपूर्ण आवश्यकता आहे.
14 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी, राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी आज कोविड – 19 चाचणी केली. राज्यसभेच्या सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या सल्ले-सुचनांनुसार, प्रत्येक सदस्याला आगामी पावसाळी अधिवेशनात हजर होण्यापूर्वी कोविड -19 चाचणी (आरटी-पीसीआर) करणे बंधनकारक आहे.
भारतातील क्रीडा क्षेत्राचे तातडीने पुनरुज्जीवन व्हावे, असे आवाहन उपराष्ट्रपती श्री एम वेंकैया नायडू यांनी केले आहे. ते म्हणाले की, चांगले आरोग्य आणि तणावमुक्त आयुष्यासाठी खेळ आणि क्रीडा किंवा योग किंवा कोणतीही शारीरिक क्रिया नागरिकांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन आज जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व अशिया क्षेत्राच्या 73 व्या सत्रांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या कोविड-19 महामारी आपतकालीन तयारीविषयीच्या मंत्रीस्तरीय अधिवेशनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व डॉ. हर्षवर्धन यांनी केले. यामध्ये त्यांनी सर्वात प्रथम कोविड-19 महामारीच्या काळात आरोग्य सेवांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. तसेच कोविड-19 महामारीमुळे भारतामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये गुंतवणुकीत वाढ सुनिश्चित करण्यासाठी भारताने कशा पद्धतीने धोरण तयार केले आहे, याची माहिती दिली.
थायलंडचे उपपंतप्रधान आणि आरोग्यमंत्री अनुतीन चार्नवीरकुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डब्ल्यूएचओ दक्षिण पूर्व आशिया प्रदेशाच्या 73 व्या सत्राच्या समाप्तीच्या वेळी, सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांनी दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील कोविड -19 ला सामूहिक प्रतिसादाबाबत एसईएआर सदस्य देशांच्या घोषणापत्राला सहमती दर्शविली.
अंबाला हवाई दल तळावर झालेल्या औपचारिक कार्यक्रमात राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलात (आयएएफ) औपचारिकपणे दाखल करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या सशस्त्र सेना मंत्री फ्लोरेन्स पार्ली या कार्यक्रमाला उपस्थित होते.
देशातील निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत, केंद्र सरकारने, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या कालमर्यादेला मुदतवाढ दिली आहे. कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. कोविड19 आजार आणि त्याचा ज्येष्ठ नागरिकांना असलेला धोका लक्षात घेऊन या, निर्णय घेण्यात आल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या कामकाजा दरम्यान गजेंद्र शर्मा वि. यूओआय आणि अन्य प्रकरणी व्याज माफी आणि इतर संबंधित मुद्द्यांवरील व्याज माफ करण्याच्या संदर्भात मिळालेल्या सवलतीसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने यासंबंधी निर्णयाची चांगल्या प्रकारे माहिती व्हावी म्हणून सरकारने सर्वंकष मूल्यांकन करण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन केली आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार काल संध्याकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, जी-20 सदस्य देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. जगात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या सामाईक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण सर्व राष्ट्रांनी एकत्रित काम करायला हवे, असे प्रतिपादन गंगवार यांनी या बैठकीत बोलतांना केले.
सरकार, राज्ये आणि स्थानिक संस्थांसमवेत विनिमयन करुन व्यवसाय सुरु करणे सुलभ करण्यासंदर्भात काम करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी केले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात भारताची स्वतःची व्यवसाय सुलभता क्रमवारीत कमालीची सुधारणा झाली आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
येत्या काही दिवसांत कोविड -19 प्रकरणांची संख्या वाढण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा लक्षात घेता राज्य सरकारने रुग्णालयांना 80 टक्के आणि उद्योगांना 20 टक्के ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. राज्यात गुरुवारी 23,446 रुग्णांची नोंद झाली यामुळे एकूण रुग्णसंख्या 9,90,795 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 2.61 लाख सक्रिय रुग्ण असून यापैकी पुण्यात 69,456, ठाण्यात 28,460 आणि मुंबईत 26,629 सक्रिय रुग्ण आहेत.
FACTCHECK


*****
B.Gokhale/S.Tupe /P.Kor