उपराष्ट्रपती कार्यालय

देशातील क्रीडा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


अनन्यसाधारण खेळाडू उत्तम नेते सुद्धा होऊ शकतात – उपराष्ट्रपती

Posted On: 11 SEP 2020 5:33PM by PIB Mumbai

 

भारतातील क्रीडा क्षेत्राचे तातडीने पुनरुज्जीवन व्हावे, असे आवाहन उपराष्ट्रपती श्री एम वेंकैया नायडू यांनी केले आहे. ते म्हणाले की, चांगले आरोग्य आणि तणावमुक्त आयुष्यासाठी खेळ आणि क्रीडा किंवा योग किंवा कोणतीही शारीरिक क्रिया नागरिकांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे.

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाचा प्रतिष्ठित मौलाना अबुल कलाम आझाद चषक पंजाब विद्यापीठाने सन 2020 मध्ये सलग दुसऱ्यांदा मिळविल्याबद्दल अभिनंदनात्मक भाषण करताना, शाळा आणि अन्य शिक्षण संस्थांनी कृतीशीलपणे क्रीडा आणि खेळांना प्रोत्साहन द्यावे, यावर त्यांनी भर दिला.

पंजाब विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना श्री नायडू यांनी सुचविले की, ट्रॉफीचा संदर्भ देताना संक्षिप्त रूप वापरू नये, नेहमीच मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी असाच उल्लेख करावा.

आपल्या देशात, विशेषतः तरुणांमध्ये जीवनशैलीच्या आजाराच्या वाढत्या घटनेबद्दल चिंता व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, आपल्या तरुणांना आरोग्यदायी ऩसलेला आहार आणि बैठे काम करण्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी जाणीव करून देणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेली  फिट इंडिया मोहीम”, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला आणि म्हणाले की, नागरिकांना सुदृढ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी ही निश्चितच प्रेरणादायी ठरेल. 

तरुणांमधून प्रतिभा शोधण्याची गरज असण्यावर भर देताना, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रभावी आणि सर्वसमावेशक प्रतिभा शोधणे आणि ती बाहेर काढण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशात क्रीडा विषयक पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याच्या आवश्यकतेला अधोरेखित करताना, विशेषत्वाने ग्रामीण भागात, श्री नायडू यांनी याच मातीत वाढलेला उच्च कौशल्य प्राप्त भारतीय प्रशिक्षकांचा एक जोडदुवा तयार करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते, असे त्यांनी नमूद केले.

अधिकाधिक महाविद्यालये आणि विद्यापीठांना क्रीडा व्यवस्थापनात पदवी आणि पदविका सुरू करण्याचे त्यांनी आवाहन केले, आपल्या खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी उच्च कौशल्य प्राप्त क्रीडा वैद्यक तज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी देखील एक बंध निर्माण केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू, श्री राज कुमार, क्रीडा संचालक, प्रशिक्षण आणि पुरस्कारार्थी यावेळी उपस्थित होते.

......

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653363) Visitor Counter : 127