उपराष्ट्रपती कार्यालय
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यसभा अध्यक्ष, वेंकैया नायडू यांची कोविड – 19 चाचणी करण्यात आली
अधिवेशन सुरू होण्याच्या 72 तासांपूर्वी सर्व खासदारांची कोविड चाचणी केली जाणार
डीआरडीओ सर्व खासदारांना मल्टी-युटिलिटी किट्स पुरवणार
Posted On:
11 SEP 2020 2:09PM by PIB Mumbai
14 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी, राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी आज कोविड – 19 चाचणी केली.
राज्यसभेच्या सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या सल्ले-सुचनेनुसार, प्रत्येक सदस्याला आगामी पावसाळी अधिवेशनात हजर होण्यापूर्वी कोविड -19 चाचणी (आरटी-पीसीआर) करणे बंधनकारक आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांनी 72 तासांच्या आत शासनाने अधिकृत केलेल्या कोणत्याही हॉस्पिटल / प्रयोगशाळेत किंवा संसद भवन संकुलात त्यांची कोविड चाचणी करुन घ्यावी.
सदस्यांच्या सोयीसाठी आजपासून संसद भवन येथे तीन चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. अधिवेशनासाठी संसद भवनात प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सदस्यांनी आधीच त्यांचे चाचणी अहवाल नियुक्त ई-मेलद्वारे राज्यसभा सचिवालयात पाठवावे अशी विनंती करण्यात आहे.
तसेच संसद सचिवालय व संसदेच्या आवारात कार्यरत अन्य एजन्सींचे कर्मचारी जे त्यांच्या कर्तव्यावर असताना संसद सदस्यांच्या संपर्कात येतात त्यांच्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, रिसेप्शन कार्यालय, संसद भवन येथे आजपासून खासदारांचे खासगी कर्मचारी आणि खासदारांच्या वाहनचालकांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शारीरिक अंतराच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी राज्यसभा कक्ष, सज्जा (गॅलरी) आणि लोकसभा कक्ष सदस्यांना बसण्यासाठी वापरले जाईल- त्यापैकी - 57 कक्षामध्ये आणि 51 राज्यसभेच्या गॅलरीमध्ये बसतील. उर्वरित 136 लोकसभेच्या सभागृहात बसतील. एकूण 244 सदस्य असून एक जागा रिक्त आहे.
चर्चेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक आसन व्यवस्थेच्या (सीटला) येथे मायक्रोफोन आणि ध्वनी कन्सोल प्रदान करण्यात आला आहे. सभासदांच्या सुरक्षेचा विचार करता सदस्यांना बसून बोलण्याची परवानगी दिली जाईल
डीआरडीओ सर्व खासदारांना मल्टी युटिलिटी कोविड किट देखील पुरवेल. प्रत्येक किटमध्ये डिस्पोजेबल थ्री प्लाय मास्क (40), वॉल नसलेले एन -95 मास्क (5), प्रत्येकी 50 मिलीलीटरच्या सॅनिटायझरच्या 20 बाटल्या, पॉलीप्रोपालीनपासून बनविलेले फेस शिल्ड (5), हातमोजे (40), टच फ्री हुक ( स्पर्श न करता दरवाजे उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी), सी बक थॉर्न टी बॅग्स ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल आणि हर्बल सेनिटेशन वाइप्स असतील.
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653309)
Visitor Counter : 238