अर्थ मंत्रालय

बँक कर्जदारांना दिलासा देण्यासंबंधी मूल्यमापन करण्यासाठी तज्ञ समिती सरकारला मदत करणार

Posted On: 10 SEP 2020 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 सप्‍टेंबर 2020

 

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या कामकाजा दरम्यान गजेंद्र शर्मा वि. यूओआय आणि अन्य प्रकरणी व्याज माफी आणि  इतर संबंधित मुद्द्यांवरील व्याज माफ करण्याच्या संदर्भात मिळालेल्या सवलतीसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली. 

त्या अनुषंगाने यासंबंधी निर्णयाची चांगल्या प्रकारे माहिती व्हावी म्हणून सरकारने सर्वंकष  मूल्यांकन करण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन  केली आहे.

तज्ञ समिती खालीलप्रमाणे असेलः

  1. राजीव मेहर्षी , देशाचे  माजी कॅग - अध्यक्ष
  2. डॉ. रवींद्र एच. ढोलकिया, माजी प्राध्यापक, आयआयएम अहमदाबाद आणि माजी सदस्य, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरण समिती
  3. बी. श्रीराम, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकचे माजी व्यवस्थापकीय संचालक

 

समितीच्या संदर्भ अटी खालीलप्रमाणे आहेतः

  1. कोविड -19 संबंधित मोरॅटोरिअम संबंधी व्याज माफीचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर  आणि आर्थिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामाचे मूल्यमापन करणे .
  2. या संदर्भात समाजातील विविध घटकांच्या आर्थिक अडचणी कमी करण्याच्या सूचना आणि त्या संदर्भात स्वीकारले जाणारे उपाय
  3. सद्य परिस्थिती लक्षात घेता आवश्यक  इतर काही सूचना / निरीक्षणे.

समिती एका आठवड्यात आपला अहवाल सादर करेल. समितीला स्टेट बँक ऑफ इंडिया सचिवात्मक सहाय्य करेल. समिती यासाठी  आवश्यक वाटल्यास बँक किंवा अन्य हितधारकांशी सल्लामसलत करू शकते.


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1653177) Visitor Counter : 274