वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
व्यवसाय सुरू करणे सुलभ करण्यासाठी सरकार, राज्ये आणि स्थानिक संस्था यांच्यासमवेत काम करत आहे-पीयुष गोयल
Posted On:
10 SEP 2020 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
सरकार, राज्ये आणि स्थानिक संस्थांसमवेत विनिमयन करुन व्यवसाय सुरु करणे सुलभ करण्यासंदर्भात काम करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी केले. ते आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात भारताची स्वतःची व्यवसाय सुलभता क्रमवारीत कमालीची सुधारणा झाली आहे.
भारताच्या विशाल सामर्थ्याविषयी बोलताना गोयल म्हणाले की भारताची वास्तव अद्वितीय विक्री व्यवस्था उच्च प्रतीची, चांगली सेवा आणि चांगले दर आहे. गुणवत्ता आणि स्पर्धात्मकतेसाठी भारताची जगभर ओळख झाली पाहिजे. भविष्याच्या नियोजनात गुणवत्ता हा अविभाज्य घटक आहे. आमचा पारदर्शक किंमती, पारदर्शक व्यापार, मुक्त बाजारपेठ, किंमत नियंत्रणे आणि कोणतीही छुपी सबसिडी नसण्यावर भर आहे.
आत्मनिर्भर भारताची संकल्पना विशद करताना गोयल म्हणाले, भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सहभागितेसाठी दरवाजे बंद केली नाहीत. वास्तविक, जागतिक व्यापारात अधिक गुंतवणूकीच्या शोधात व्यापकपणे दरवाजे उघडण्याची संकल्पना आहे. आता भारताला जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थांमध्ये सामर्थ्यासह उच्च दर्जाचे उत्पादन खर्च कमी किंमतीत प्रतिस्पर्धी उत्पादनांमध्ये गुंतवावे लागेल, मंत्री म्हणाले.
व्यापारिक संबंध वाढविण्यासाठीही भारताला इतर देशांशी संपर्क साधावा लागेल पण, तो आपल्या स्वत: च्या स्पर्धात्मकतेच्या बळावर. जर इतर देशांना 130 कोटींच्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश हवा असेल तर, त्यांना आपल्या बाजारपेठेत भारतीयांना बरोबरीने प्रवेश द्यावा लागेल, असे पीयुष गोयल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत आणि निर्णायक नेतृत्वाचे कौतुक करताना गोयल म्हणाले, आरसीईपी करारावर (RCEP) भारताने स्वाक्षरी केली नाही, कारण यात भारताच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले नव्हते. ते म्हणाले भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा नियम-आधारीत व्यापारावर विश्वास आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासमवेत आयआयएफटीच्या भागीदारीविषयी बोलताना गोयल म्हणाले, आयआयएफटीच्या विद्यार्थ्यांनी निर्यातीसाठी नव-नवीन उत्पादने शोधावी. संशोधन, विश्लेषण आणि माहिती संकलन यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा जेणेकरुन सरकारला जगातील सर्वोत्तम पद्धतींची माहिती होईल आणि भारताच्या नागरिकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अधिक चांगले काम करता येईल. ते म्हणाले, व्यापार धोरण वादविवाद, चर्चा, आढावा, फेररचनेसाठी विद्यार्थ्यांसमोर आहे. मला खात्री आहे, तुम्ही भारतीय व्यापार धोरणाच्या भवितव्यावर आणि कोविड संक्रमणातून आपण कसे बाहरे पडू यावर चर्चा कराल, असे मंत्री म्हणाले.
भारताविषयी बोलताना श्री गोयल म्हणाले की अलीकडेच भारतीय निर्यातीत वाढ होताना दिसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13% अधिक निर्यात झाली आहे, कोविड परिस्थिती आणि टाळेबंदीतही निर्यात चांगली झाली आहे. आता व्यापारी निर्यातीत देखील भरभराट होईल हे पाहणे आवश्यक आहे.
भारतीय उद्योगांचे परिश्रम आणि कष्टाची प्रशंसा करताना गोयल म्हणाले, फक्त 5 महिन्याच्या काळात शून्यातून भारत पीपीई आणि मास्क उत्पादनात स्वावलंबी बनला आहे. ते म्हणाले की, या उत्पादनांमध्ये भारत केवळ स्वावलंबी झाला नाही, तर त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करीत आहे.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653185)
Visitor Counter : 201