PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


संसर्गजन्य आजार नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक अध्यादेश काढण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्र सरकार, कोविड-19 बाबत दूरध्वनीच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करणार; नागरिकांना NIC च्या माध्यमातून, 1921 या क्रमांकावरुन संपर्क केला जाणार

Posted On: 22 APR 2020 7:20PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)

नवी दिल्‍ली-मुंबई, 22 एप्रिल 2020

पर्यावरण संरक्षण हे आपल्या सर्वांचे पवित्र नागरी कर्तव्य असून हरित आणि स्वच्छ पृथ्वीच्या निर्मितीसाठी सर्व नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले. विकास प्रारूपांची पुनर्रचना आणि उपभोगवादी जीवनशैलीचा त्याग करून पृथ्वीचे संरक्षण करण्याला आपण महत्त्व देऊया असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर विकास आणि आर्थिक धोरणांबाबत नव्याने विचार होण्याची आवश्यकता उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

“जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण सर्वजण अपार काळजी आणि करुणेने भरलेल्या आपल्या वसुंधरेप्रति नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो. स्वच्छ, निरोगी आणि अधिक समृद्ध वसुंधरेसाठी कार्य करण्याचा आपण संकल्प करूया. कोविड -19 वर मात करण्यासाठी आघाडीवर लढणाऱ्या सर्वांचा उद्घोष करूया” असे पंतप्रधान म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आज कोविड-19 संदर्भात खालील माहिती दिली गेली.

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन  आज भारतीय वैद्यकीय परिषदेचे (IMA),वरिष्ठ प्रतिनिधी आणि डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून चर्चा केली. कोविड-19 च्या लढ्यात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी देत असलेल्या योगदानाची दाखल घेत त्यांच्या सुरक्षेविषयीच्या समस्या गृहमंत्र्यांनी जाणून घेतल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याणासाठीच्या प्रयत्नांत सरकार कोणतीही कसूर करणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री  अमित शाह यांनी यावेळी दिली. 

त्यासोबतच, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोविड-19 विषयक सेवा देत असलेले सर्व डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. सध्याच्या काळात, कोविडशी लढा देण्यात वैद्यकीय कौशल्ये आणि सेवा देत असलेले सर्व तज्ञ आणि इतर सहायक या लढ्यात लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहेत. त्यामुळे, या सर्वांसाठी मनुष्यबळ आणि क्षमता बांधणी प्रशिक्षण, तसेच वैद्यकीय सुरक्षा, कर्मचाऱ्यांसाठींची मार्गदर्शक तत्वे, वेळेत मानधन, भावनात्मक आणि मानसिक आधार, प्रशिक्षण आणि विम्याचे संरक्षण अशा सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

त्याशिवाय,  संसर्गजन्य आजार नियंत्रण कायदा 1897अंतर्गत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक अध्यादेश काढण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.

रॅपिड अँटीबॉडी चाचण्या करण्याविषयीचे प्रोटोकॉल ICMR ने सर्व राज्यांना पाठवले आहेत. रॅपिड अँटीबॉडी चाचणी केवळ निरीक्षणासाठी केली जाते असा पुनरुच्चार त्यात करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर देखील या चाचणी विषयीचे अध्ययन विकसित होत असून, व्यक्तीच्या शरीरात किती अँटीबॉडीज तयार होतात, याची माहिती घेण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहे.या चाचणीचे निकाल आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. या चाचण्या, कोविड-19 च्या निदानासाठी,  RT-PCR ला पर्याय म्हणून वापरल्या जाऊ शकत नाही, असे ICMR ने स्पष्ट केले आहे. या आजूबाजूच्या परिस्थितीनुरुप या रॅपिड अँटी बॉडी चाचण्यांची उपयुक्तता कितपत आहे याचे मूल्यमापन करण्यासाठी विविध राज्यांना आकडेवारी संकलित करण्यात मदत करण्याचे आश्वासन ICMR ने दिले असून, त्या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, असेही सांगितले आहे. राज्यांनी या चाचण्या करतांना सर्व प्रोटोकॉल पाळावेत, अशी सूचना ICMR ने केली आहे.

केंद्र सरकार, कोविड-19 बाबत दूरध्वनीच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करणार असून नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर NIC च्या माध्यमातून, 1921 या क्रमांकावरुन संपर्क केला जाईल. हे खरे सर्वेक्षण असून सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होत, आपली योग्य माहिती, आणि कोविड संदर्भात काही लक्षणे जाणवल्यास ती सांगावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. मात्र अशा स्वरूपाच्या बनावट सर्वेक्षणापासून सावध राहा, असेही आवाहन करण्यात आले आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी या सर्वेक्षणाबाबत जनजागृती करावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण अधिकृत असल्याची माहिती द्यावी असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. राज्यांच्या आरोग्य तसेच इतर विभागांच्या संकेतस्थळावरुनही ही माहिती प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत देशभरात कोविड-19 चे 3870 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 19.36% इतका झाला आहे. आतापर्यंत देशात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 19,984 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 50 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

 

  इतर अपडेट्स :

 

महाराष्ट्र अपडेट्स

552 नव्या केसेसह महाराष्ट्रातील कोविड-19 रुग्णसंख्या 5,218 झाली. मुंबईमध्ये 355 नव्या केसेस नोंद झाल्या आणि एकूण संख्या 3,445 झाली जी भारतातील कोणत्याही शहरासाठी सर्वात जास्त आहे. आतापर्यंत 779 लोक बरे झाले आहेत.

मुंबईतील 53 पत्रकार पॉझिटिव्ह आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या ज्याद्वारे त्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले असून माध्यमांच्या व्यवस्थापकांना कर्मचार्‍यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय टीमने आज धारावी परिसराला भेट देऊन तेथील शिबिराची आणि विलगीकरण सुविधेची पाहणी केली. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे होते. केंद्रीय टीमने मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली

Fact Check on #Covid19

 

 

 

 

 

***

 

RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1617242) Visitor Counter : 427