• Skip to Content
 • Sitemap
 • Advance Search
नौवहन मंत्रालय

भारतीय बंदरे आणि त्याच्या परिसरात भारतीय नाविकांच्या आगमन आणि प्रस्थाना संबधी एसओपीएस जारी

बंदरांवरील चालक दल आता बदलता येणार असल्याच्या गोष्टीचे मनसुख मांडविया यांनी स्वागत केले

Posted On: 22 APR 2020 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2020


केंद्रीय नौवहन (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय बंदरांवर भारतीय नाविकांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या एसओपीएस जारी करण्याचे स्वागत केले आहे. गृह मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता बंदरांवरील चालक दल बदलणे शक्य होणार आहे, मांडविया यांनी यासाठी ट्विटर वरून गृह मंत्र्याचे आभार मानले आहेत. यामुळे हजारो नाविकांचा त्रास संपेल असे ते म्हणाले.

 
  
 

व्यापारी जहाजाच्या क्रियान्वयनासाठी जहाजावरील चालक दल बदलणे हा महत्वपूर्ण उपाय आहे. गृह मंत्रालयाने (एमएचए) 21 एप्रिल 2020 रोजी प्रमाणित कार्य प्रणाली (एसओपीएस) जाहीर केली आहे. व्यापारी जहाजांसाठी भारतीय बंदरांमध्ये भारतीय नाविकांचे आगमन आणि प्रस्थान सुरळीत व्हावे यासाठी या एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. खालील मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत: 

 

 1. आगमनासाठी 
  1. जहाज मालक/ भरती आणि नियुक्ती सेवा (आरपीएस) एजन्सी जहाजात प्रवेश करण्यासाठी भारतीय नाविकांची ओळख पटवतील.
  2. नौवहन महासंचालकांनी (डीजीएस) सांगितलेल्या प्रक्रियेनुसार, नाविक त्यांची मागील 28 दिवसांच्या प्रवासाची आणि संपर्काची सर्व माहिती जहाज मालक/ आरपीएस एजन्सीला ईमेल द्वारे कळवतील.
  3. या उद्देशासाठी विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार डीजीएसने मान्यता दिलेल्या वैद्यकीय परीक्षकाकडून नाविकाची तपसणी केली जाईल. त्याचवेळी नाविकाची देखील तपासणी केली जाईल आणि मागील 28 दिवसांपर्यंत त्याने केलेला प्रवास आणि संपर्क यादी देखील तपासली जाईल; नाविकामध्ये कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळली नाहीतर तो जहाजात प्रवश करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी जाऊ शकतो.
  4. नाविक ज्या ठिकाणी राहतो तिथल्या स्थानिक प्राधिकरणाला त्याच्या राहत्या ठिकाणापासून जहाजावर पोहोचण्यासाठीच्या गंतव्य स्थानापर्यंतच्या प्रवासाला मंजुरी देण्यासाठी वाहतूक पास जारी करण्याबद्दल सूचित केले जाईल. 
  5. नाविक जिथे राहतो ते राज्य/ केंद्र शासितप्रदेश सरकार नाविक आणि एका वाहन चालकासाठी असा वाहतूक पास जारी करू शकते.
  6. वाहतूक पास (टू एंड फ्रो) एका निश्चित मार्गासाठी आणि विशिष्ठ वैधतेसह जारी केला जाईल आणि याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. अशा वाहतूक पासला वाहतूक मार्गासह राज्य/ केंद्र शासित प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी लागेल.  
  7. नाविकाला त्याच्या गंतव्य स्थानकाकडे घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये सामाजिक अंतर आणि आरोग्यविषयक इतर मानक निकषांनूसार स्वच्छतेच्या सगळ्या नियमांचे पालन केले पाहिजे. 
  8. बंदरात प्रवेश करताना नाविकाची कोविड-19 चाचणी केली जाईल; चाचणी मध्ये नाविक कोविड-19 संक्रमित नसेल तर त्याला पुढील प्रवेशाची परवानगी दिली जाईल, आणि जर तो चाचणी मध्ये बाधित आढळला तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल. 

 

 1. प्रस्थानासाठी 
  1. कुठल्याही परदेशी बंदरावरून किंवा कोणत्याही  भारतीय बदरातून समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजाच्या मालकाने त्या जहाजावरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्या आरोग्याचे सागरी घोषणापत्र बंदराच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आणि बंदर प्राधिकरणाला सादर करावे. याव्यतिरिक्त, बंदरातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जहाज मालक बंदरातील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना हवी असणारी तापमान चार्ट, आरोग्यविषयक वैयक्तिक स्वयं घोषित तपशील  इत्यादी माहिती प्रदान करेल. 
  2. जहाजावर प्रवेश करणारे भारतीय नाविक तो/ती कोविड-19 बाधित नाही याची पुष्टी करण्यासाठी त्याची कोविड-19 चाचणी केली जाईल. गाडीतून खाली उतरल्यानंतर ते बंदर आवरातील चाचणी सुविधेपर्यंत पोहोचेपर्यंत मानक आरोग्य शिष्टाचारानुसार सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली गेली आहे याची जहाज मालक खात्री करून घेईल. 
  3. नाविकाचा चाचणी अहवाल येईपर्यंत, नाविकाला बंदर/राज्य आरोग्य प्राधिकरणा द्वारे विलगीकरण कक्षात ठेवले जाईल. 
  4. जर नाविकाच्या चाचणी अहवालात तो कोविड- 19 बाधित असल्याचे निष्पन्न झाले तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल.  
  5. जर नाविकाच्या चाचणी अहवालात तो/ती कोरोना बाधित नसल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला प्रस्थानाची परवानगी मिळाली तर जिथे नाविक राहतो तिथल्या स्थानिक प्रशासनला बंदरापासून त्याच्या घरापर्यंत प्रवास करण्याची मंजुरी देण्यासाठी वाहतूक पास जारी करण्यासंबंधित सूचित केले जाईल.
  6. नाविक ज्या बंदरात उतरला आहे तेथील राज्य/ केंद्र शासितप्रदेश सरकार नाविक आणि एका वाहन चालकासाठी असा वाहतूक पास जारी करू शकते.
  7. वाहतूक पास (टू एंड फ्रो) एका निश्चित मार्गासाठी आणि विशिष्ठ वैधतेसह जारी केला जाईल आणि याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. अशा वाहतूक पासला वाहतूक मार्गासह राज्य/ केंद्र शासित प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी लागेल.  
  8. नाविकाला त्याच्या गंतव्य स्थानकाकडे घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये सामाजिक अंतर आणि आरोग्यविषयक इतर मानक निकषांनूसार स्वच्छतेच्या सगळ्या नियमांचे पालन केले पाहिजे. 

महासंचालक (नौवहन) उपरोक्त प्रकरणातील आगमन आणि प्रस्थाना संदर्भातील सविस्तर शिष्टाचार विहित करतील.

 
* * *


G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1617105) Visitor Counter : 109


Link mygov.in