• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती भवन परिसरात कोविड-19 चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या वृताबाबत स्पष्टीकरण

Posted On: 21 APR 2020 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल 2020

 

राष्ट्रपती भवन परिसरात कोविड-19 चा रुग्ण आढळल्याविषयीचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आणि त्या संदर्भात तर्कवितर्क आणि शक्यतांना विराम देण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयाने काही तथ्ये समोर आणली आहेत.   

  1. मध्य दिल्लीतील रहिवासी असलेल्या कोविड-19 च्या  एका रूग्णाचा 13 एप्रिल 2020 रोजी नवी दिल्लीतील बी एल कूपर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र ही व्यक्ती राष्ट्रपती सचिवालयातील कर्मचारी नव्हती तसेच ते राष्ट्रपती भवन परिसरातील रहिवासी देखील नव्हते. 
  2. कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला असता, असे आढळले की राष्ट्रपती सचिवालयातील एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एक सदस्य या मृत व्यक्तीच्या संपर्कात आले होते. 
  3. हा कर्मचारी आणि त्याचे कुटुंबीय राष्ट्रपती भवन परिसरातील पॉकेट 1, विभाग अ मध्ये राहतात. त्यामुळे, कोविड-19 च्या उपचारासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांनुसार, या कुटुंबातील सातही सदस्यांना 16 एप्रिल रोजी मंदिर मार्ग इथे विलगीकरण कक्षात हलवण्यात आले.   
  4. त्यानंतर, या कुटुंबियांपैकी जी व्यक्ती कोरोनाबाधीताच्या संपर्कात आली होती, तिलाही कोरोनाचां संसर्ग झाल्याचे आढळले आहे. राष्ट्रपती सचिवालयात कार्यरत कर्मचाऱ्यासह, कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची कोविडची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
  5. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करत, तसेच आणि महामारी नियंत्रण कायदा 1897 च्या नियमान्वये पॉकेट 1 मधील विभाग अ मधल्या 115 निवासांमधील लोकांच्या हालचाली आणि वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून त्यांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व रहिवाशांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांच्या घरीच केला जात आहे.
  6. इथे हे स्पष्ट करण्यात येत आहे की आतापर्यंत राष्ट्रपती सचिवालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले नाही. तसेच, सचिवालय आणि स्थानिक प्रशासन, सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करत आहे.

* * *

 

U.Ujgare/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1616976) Visitor Counter : 186


Link mygov.in