पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 1000हून अधिक एलपीजी वितरकांशी साधला संवाद; मोफत उज्ज्वला रिफिल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायला सांगितले
Posted On:
22 APR 2020 12:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 1000 हून अधिक एलपीजी वितरकांशी संवाद साधला.
लॉकडाऊन दरम्यान एलपीजी सिलिंडर्सची घरापर्यंत सेवा सुनिश्चित करण्यात त्यांनी बजावलेल्या उत्तम कामाची त्यांनी प्रशंसा केली. गरीबांना कोविड-19 विरुद्ध लढ्यात मदत करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमयूवाय) लाभार्थ्यांपर्यंत तीन मोफत एलपीजी सिलिंडर्स लवकरात लवकर पोहचवण्याचे आवाहन त्यांनी वितरकांना केले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि सिलिंडर पोहचवणाऱ्यांची तसेच ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एलपीजी सिलिंडर्सच्या स्वच्छतेसह सर्व आवश्यक खबरदारी घेतल्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांनी वितरकांना ग्राहकांपर्यंत सेवा पोहचवण्यासाठी डिलीव्हरी बॉय कायम ठेवण्यास सांगितले आणि त्यांच्यामार्फत ग्राहकांना साथीच्या रोगावर मात करण्यासाठी मास्क वापरण्याचे महत्त्व,आरोग्यसेतू अॅप, हात वारंवार धुणे आणि शारीरिक अंतर याबाबत जागरूकता निर्माण करायला सांगितले. ते पुढे म्हणाले की, आघाडीवर लढणारे योद्धे म्हणजेच डिलिव्हरी बॉईज ग्राहकांमध्ये या उपयुक्त माहितीचा प्रसार करण्यात प्रभावी ठरले आहेत. त्यांनी वितरकांना कामाच्या ठिकाणी संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी शारीरिक अंतर,स्वच्छता यासारख्या मानक परिचालन प्रोटोकॉलचे पालन करत हे चांगले कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी एलपीजी योद्धयांप्रती सहानुभूती बाळगण्याचे आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन केले.
U.Ujgare/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1616972)
Visitor Counter : 210
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam