• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
गृह मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामधून शेती आणि वन क्षेत्रासाठी अतिरिक्त परवानग्यांबरोबरच, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची दुकाने आणि इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

भारतीय खलाशांना भारतीय बंदरांमध्ये ये-जा करण्यासाठी गृहमंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे

Posted On: 21 APR 2020 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल 2020
 

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामधून गृह मंत्रालयाने (एमएचए) एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार काही उपक्रमांना सूट देण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश खालील लिंकवर उपलब्ध आहे.

(https://www.mha.gov.in/sites/default/files/MHA%20order%20dt%2015.04.2020%2C%20with%20Revised%20Consolidated%20Guidelines_compressed%20%283%29.pdf)

उपरोक्त सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामधून सरकारने शेती आणि वन क्षेत्रासाठी अतिरिक्त परवानग्यांबरोबरच, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची दुकाने आणि इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय खलाशांना भारतीय बंदरांमध्ये ये-जा करण्यासाठी गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्वेसुद्धा जारी केली आहेत.

हॉटस्पॉट आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी वर नमूद केलेल्या सवलती लागू नाहीत. या क्षेत्रात या सवलतींना परवानगी नाही.

अधिकृत परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

* * *

 

B.Gokhale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1616984) Visitor Counter : 114


Link mygov.in