• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

“भारत कोविड-19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी” 15,000 कोटी रुपयांच्या पैकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 22 APR 2020 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविड-19 या जागतिक संसर्गजन्य आजाराच्या संकटातून मात करण्यासाठी भारताच्या आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी आवश्यक अशा 15,000 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली. या पॅकेजसाठी मंजूर करण्यात आलेला निधी तीन टप्प्यांत वापरला जाणार आहे. कोविड-19 चा सामना करण्यात तातडीच्या उपायांसाठी (7,774 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि उरलेला निधी येत्या चार वर्षात मिशन मोडवर आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी  वापरला जाणार आहे. 

या पॅकेजची महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे, त्यात भारतात, कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आकस्मिक प्रतिसादाची व्यवस्था असून त्या अंतर्गत, निदान आणि कोविड समर्पित रुग्णालये व उपचार सुविधा, संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती औषधे आणि उपकरणे यांची व्यवस्था, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करत भविष्यात या आजाराचा उद्रेक होण्याची शक्यात लक्षात घेत, रुग्णालये आणि इतर व्यवस्था सज्ज ठेवणे, निरीक्षण कामांसाठी प्रयोगशाळा आणि इतर व्यवस्था तयार करणे, जागतिक संसर्गजन्य आजारविषयक संशोधन आणि समुदायांचा सहभाग, संपर्कातून असणाऱ्या धोक्यांविषयी सातत्याने माहिती देणे अशी कामे केली जाणार आहेत. ही सर्व कामे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यांत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, इतर मंत्रालयांच्या सहकार्याने, अनेक कामे याआधीच सुरु केली आहेत. जसे की: -

  1. सध्या असलेल्या आरोग्य सुविधा अधिक बळकट आणि अद्ययावत करत, कोविड-19 च्या आजारावर उपचार करण्यासाठी समर्पित रुग्णालये, कोविड हेल्थ सेन्टर्स, कोविड केअर सेंटर्स यांची उभारणी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 3,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त फंड देणे. विलगीकरण, अलगीकरण, चाचण्या, उपचार, आजाराचे संक्रमण रोखणे, संक्रमित भाग बंद करणे, सामाजिक नियमांचे पालन आणि निरीक्षण यासाठीची सविस्तर मार्गदर्शक तत्वे, प्रोटोकॉल आणि नियमावली जारी करणे हॉटस्पॉट ओळखून तिथे प्रतिबंधक उपाययोजना राबवणे
  2. निदान करण्यासाठीच्या प्रयोगशाळांची क्षमता आणि संख्या वाढवण्यात आली असून दरोज आपली चाचण्यांची क्षमता वाढते आहे. किंबहुना, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत संध्या असलेल्या बहु-रोग चाचणी व्यवस्थेचा लाभ घेत, तिथे कोविड-19 च्या चाचण्या करण्यासाठी 13 लाख चाचणी किट्सची ऑर्डर देण्यात आली आहे.
  3. सामुदायिक आरोग्य स्वयंसेवकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेज अंतर्गत विमासंरक्षण देण्यात आले आहे. त्याशिवाय, PPE सूट, एन-95 मास्क, व्हेंटीलेटर, चाचण्यांच्या किट्स आणि औषधे यांचा पुरवठा केंद्राकडून सातत्याने होत आहे.

 

या निधीपैकी मोठा हिस्सा आकस्मिक आरोग्य संकटांच्या साज्ज्तेसाठी खर्च केला जाईल. त्याशिवाय, अशा जागतिक संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी संशोधन व बहु-विभागीय राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली जाईल. यात समुदायांचा सहभाग वाढवणे, आजाराच्या धोक्याविषयी माहिती आणि त्यापासून बचावासाठी उपाययोजना, क्षमता बांधणी, देखरेख इत्यादी कामे केली जातील.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला या पैकेजमधील घटकांच्या गरजेनुसार मनुष्यबळाची पुनर्रचना करण्याचे आणि बदलत्या परिस्थितीत व गरजेनुसार, अंमलबजावणी करणाऱ्या वैद्यकीय संस्थाच्या कार्यक्षेत्रात बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

* * *

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com


(Release ID: 1617193) Visitor Counter : 339


Link mygov.in