वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
अँटी-डम्पिंग ड्युटी बाबत मुदत निर्धारण कालावधीच्या पुनरावलोकनानंतर सुधारित कालावधी
प्रविष्टि तिथि:
21 APR 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2020
दिनांक 12 डिसेंबर 2017 च्या व्यापार सूचना क्रमांक 02/2017 अंतर्गत व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या व्यापार महासंचालनालयाने (डीजीटीआर) सीमाशुल्क कायदा 1975 आणि अँटी-डम्पिंग नियम अंतर्गत अँटी-डम्पिंग सनसेट रिव्ह्यू तपासणी (एसएसआर) अर्थात मुदत निर्धारण कालावधी लागु करण्यासाठी कार्यपद्धती आणि कालावधी निश्चित केला आहे. एसएसआर अर्ज भरण्यासाठी या सूचनेत सध्या लागू असलेल्या अँटी-डम्पिंग उपाय योजनेचा कालावधी संपण्यापूर्वी 270 दिवसांची मुदत देण्यात आली होती जी विलंबाचे उचित कारण दिल्यास 240 दिवस शिथिल केली जाऊ शकत होती.
असे आढळून आले आहे की, एसएसआर अर्ज भरण्याच्या मुदतीच्या नियमामुळे म्हणजेच समाप्तीच्या 270 दिवस आधी किंवा उशीराचे उचित कारण देऊन अर्ज भरण्यामुळे बऱ्याच प्रमाणात शिस्त आली असून मुदत संपण्याच्या बराच काळ आधी एसएसआर अर्ज दाखल केले जात आहेत. तथापि, अनेकदा स्थानिक उद्योगांकडून निवेदने प्राप्त होत आहेत की अपरिहार्य कारणांमुळे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये ही मुदत संपुष्टात येण्यापूर्वी किमान 240 दिवसांच्या निर्धारित कालावधीचे पालन करायला ते असमर्थ असतात.
उद्योगांच्या या तक्रारीचे निवारण करण्यासाठी, डीजीटीआरने 20 एप्रिल 2020 रोजी एक व्यापार सूचना (क्रमांक 02/2020) जारी केली आहे, ज्यामध्ये 270 दिवसांच्या मुदतीची पूर्तता करण्यासाठी देशांतर्गत उद्योगाला तोंड द्यावे लागणार्या वास्तविक अडचणींमुळे उपाययोजना संपुष्टात येण्याच्या तारखेपूर्वी 180 दिवसांपर्यंतची मुदत पुनरावलोकनानंतर देण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी अपवादात्मक परिस्थितीत मुदत समाप्तीपूर्वी 120 दिवसांपर्यंतही ही कालावधी शिथिल करू शकेल.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1616893)
आगंतुक पटल : 235