PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 28 OCT 2020 7:25PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

दिल्ली-मुंबई, 28 ऑक्टोबर 2020

 

पंतप्रधानांनी सतर्क भारत, समृद् भारत या कल्पनेवर आधारित दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंध यावरील राष्ट्रीय परिषदेचे व्हीडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. नागरीकांच्या सहभागातून सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सचोटी यांची वृद्धी यासंदर्भात भारताची कटीबद्धता यावर भर देणारे दक्षता विषयक मुद्दे यांना केंद्रस्थानी ठेवून केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (CBI) हा कार्यक्रम आयोजित केला गेला.

 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पीओ आणि संरक्षण मंत्री डॉ. मार्क टी एस्पर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये करावयाच्या सहकार्याविषयी तसेच इतर क्षेत्रातल्या संयुक्त प्रकल्पांविषयी मंत्रीस्तरावर झालेल्या उपयुक्त आणि सकारात्मक संवादाची थोडक्यात माहिती अमेरिकेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना दिली.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

केंद्र सरकारसोबत राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांचे उद्दीष्टपूर्ण धोरण आणि कृतीशील उपाययोजना यामुळे प्रति दशलक्ष रुग्णसंख्या आणि प्रति दशलक्ष मृत्यू कमी असलेल्या देशांमध्ये भारताचे स्थान कायम राहिले आहे.

जागतिक स्तरावर प्रति दशलक्ष रुग्ण संख्या 5552 इतकी आहे तर भारतात ही संख्या 5790 इतकी आहे. अमेरिका, ब्राझील, युके, रशिया आणि दक्षिण आफ्रिका येथे रुग्ण संख्येचे प्रमाण जास्त आहे.

भारतात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे कोविडमुळे 87 लोकांचा मृत्यू होत आहे तर जागतिक स्तरावर हे प्रमाण सरासरी 148 इतके आहे. कोविड-19 व्यवस्थापनासंदर्भात भारताचे उद्दिष्टपूर्ण धोरण आणि कृतिशील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यामुळे भारतात चांगले परिणाम दिसून येत आहेत.

कोविड-19 नमुन्यांच्या चाचण्यांमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या देशांमध्ये देखील भारताने आपले स्थान कायम ठेवले आहे. गेल्या 24 तासात भारतात 10,66,786 इतक्या चाचण्या झाल्या आहेत. यामुळे एकूण चाचण्यांची संख्येने 10.5 कोटींचा (10,54,87,680) आकडा पार केला आहे.

सातत्यपूर्ण व्यापक आणि सर्वसमावेशक चाचण्यांमुळे रुग्णांची लवकर ओळख आणि वेळेवर प्रभावी उपचार यास मदत होत आहे परिणामी रुग्ण बरे होत असून मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. भारताचा मृत्यु दर सध्या 1.50% आहे.

सक्रिय रुग्ण संख्येचा कल कमी राखण्यात भारताने सातत्य ठेवले आहे. भारतात सध्या एकूण रुग्णसंख्येच्या 7.64 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. भारतात एकूण पॉझिटीव्ह रुग्ण 6,10,803 आहेत तर देशात एकूण 72,59,509 रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात देशात 43,893 नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 58,439 रुग्ण बरे झाले आहेत. 77% नवीन बरे झालेले रुग्ण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ मध्ये एका दिवसात 7 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

79 टक्के नवीन रुग्ण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्राला मागे टाकून केरळमध्ये आता सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळ मध्ये अजूनही पाच हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातही रुग्ण संख्या आहे.

गेल्या चोवीस तासात कोविड मुळे 508 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 79 टक्के मृत्यू दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे महाराष्ट्रात सर्वाधिक 115 मृत्यूंची नोंद झाले आहे.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ई संजीवनी या टेली मेडिसिन या उपक्रमाने 6 लाख टेली सल्ल्यांचा टप्पा पार केला आहे. शेवटच्या एक लाख सल्ल्यांचा टप्पा केवळ 15 दिवसात साध्य झाला आहे.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स:

मुंबईतील सर्व 24 प्रशासकीय वॉर्डमध्ये कोविड19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता शंभर दिवसांवर पोहोचला आहे, सामान्यपणे मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 139 दिवस आहे. मुंबईतील सर्व विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढविण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका यशस्वी प्रयत्न करत असून कोविडच्या प्रसाराला आळा घालण्यात येत आहे. महाराष्ट्रातही कोविड परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे. राज्यात मंगळवारी 7,836 रुग्ण बरे झाले तर 5,363 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात सक्रीय रुग्णांची एकूण संख्या 1.31 लाख इतकी झाली आहे.

 

FACT CHECK

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008FGQ3.jpg

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668211) Visitor Counter : 184