वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे जागतिक समुदायाला कोविड19 वर, योग्य प्रमाणात आणि परवडणाऱ्या किंमतींमध्ये लसी आणि औषधांची वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आवाहन

Posted On: 27 OCT 2020 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक समुदायाला कोविड19 वर, योग्य प्रमाणात आणि परवडणाऱ्या किंमतींमध्ये लसी आणि औषधांची वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. आज झालेल्या डब्ल्यूटीओ मंत्र्यांच्या आभासी बैठकीत आपल्या ते म्हणाले की, मर्यादित उत्पादन क्षमता असलेल्या देशांना, या वैद्यकीय पुरवठ्यासंदर्भातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने ट्रिप्स माफी प्रस्तावित केली आहे. यासंदर्भात सर्व सभासदांनी या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोविड - 19 मुळे जागतिक आर्थिक आणि व्यापार व्यवस्थेतील दुर्बलता आणि असमानता समोर आली आहे, असे गोयल यावेळी म्हणाले. तातडीची आव्हाने सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि असमतोल जागतिक व्यापार प्रणालीत सुधारणा कशी करावी यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले. गोयल म्हणाले की, प्रत्येक संकट, हे प्रगतीच्या मार्गांसाठी नवीन संधी देते यावर भारताचा विश्वास आहे, असे त्यांनी नमूद केले.

गोयल म्हणाले की, साथीच्या आजाराने आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या सीमेवरील सहज वाहतुकीच्या आवश्यकतेवर देखील प्रकाश टाकला आहे. चालू मत्स्य पालन अनुदान वाटाघाटीच्या मुद्यांवर मंत्री म्हणाले की काही देशांकडून होणाऱ्या औद्योगिक मासेमारीच्या समस्येवर चर्चेतून तोडगा निघाला पाहिजे कारण यामुळे जागतिक मत्स्यसाठ्यात मोठी घट झाली आहे.

विकसनशील देशांना जागतिक व्यापार व्यवस्थेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे समाकलित होण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक बाजूंवर बंधने घालण्याचे कोणतेही प्रयत्न भारत स्वीकारणार नाही असे ते म्हणाले.

असमान विकास, असमान पातळीवरील आर्थिक विकास आणि राष्ट्रांमधील मानवी विकास निर्देशकांमध्ये असमानता लक्षात घेऊन कमी विकसित आणि विकसनशील देशांसाठी आपण अधिकाधिक संधी निर्माण केल्या पाहिजेत,  जेणेकरून जागतिक व्यापार योग्य आणि शाश्वत होईल, असे ते म्हणाले.

 

M.Chopade/S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667992) Visitor Counter : 172