वित्त आयोग

15 व्या वित्त आयोगाचा मागील वित्त आयोगाच्या अध्यक्षांशी संवाद

Posted On: 28 OCT 2020 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020

 

15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आणि सदस्यांनी आज 12 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ सी रंगराजन,13 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डी विजय केळकर यांच्याशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. 

15 व्या वित्त आयोगाला 2021-26 साठीचा आपला अहवाल 30 ऑक्टोबरपर्यंत सादर करायचा आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आयोग काम करत आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक घडामोडींना बसलेली खीळ,वित्तीय मापदंडावर त्याचा परिणाम यासारख्या कठीण आव्हानात्मक परिस्थितीत  15 व्या वित्त आयोगाच्या कामाची, मागील वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी प्रशंसा केली. मागील वित्त आयोगाचा ढाचा आणि त्यांच्या अध्यक्षांशी केलेली चर्चा यातून मिळालेल्या विचार आणि सखोल माहितीबद्दल 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष  आणि सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668138) Visitor Counter : 2051