संरक्षण मंत्रालय
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना 174.44 कोटी रुपयांचा अंतिम लाभांश धनादेश प्रदान
Posted On:
28 OCT 2020 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2020
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीईएलने 140% अंतिम लाभांशाच्या रुपाने देशाचे राष्ट्रपती यांच्या समभागावर देय असलेला 174,43,63,569.20/- कोटी रुपयांचा धनादेश सादर केला. बीईएलचे व्यवस्थापकीय संचालक एम व्ही गौतम यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. 140% अंतरिम लाभांश (प्रती भागधारक 1 रु दर्शनी मुल्य) केंद्र सरकारकडे फेब्रुवारी 2020 मध्ये सुपूर्द करण्यात आला होता.
बीईएल, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादनविषयक नवरत्न कंपनी आहे. कंपनीने 2019-20 आर्थिक वर्षात केंद्र सरकारला 280% एकूण लाभांश प्रदान केला आहे.
याप्रसंगी संरक्षण उत्पादन सचिव राजकुमार यांची उपस्थिती होती.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668133)
Visitor Counter : 210