आदिवासी विकास मंत्रालय
श्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते दोन आदिवासी कल्याण उत्कृष्टता केंद्राचा प्रारंभ, आर्ट ऑफ लिव्हिंगची भागीदारी
पंचायती राज संस्थांचे मजबुतीकरण हे त्यांना त्यांच्या समाजाचा विकास आणि त्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी सक्षम करेल : श्री अर्जुन मुंडा
Posted On:
27 OCT 2020 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020
केंद्रिय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते आज केंद्रिय आदिवासी विकास मंत्रालय आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दोन आदिवासी कल्याण उत्कृष्टता केंद्रांचा प्रारंभ करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. आदिवासी विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री श्रीमती रेणुका सिंग सरूता, आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव श्री दिपक खांडेकर आणि सहसचिव श्री नवलजीत कपूर हे देखील उपस्थित होते.
समारंभाला संबोधित करताना, श्री अर्जुन मुंडा म्हणाले की, महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना गो – आधारित शेतीच्या तंत्रावर आधारित शाश्वत नैसर्गिक शेतीबाबत प्रशिक्षण देण्याचा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा (एओएल) अतिशय स्तुत्य सहभाग आहे; आणि दुसरे उत्कृष्टता केंद्र (सीओई) म्हणजे झारखंडमधील पाच जिल्ह्यातल्या 150 गावातील 30 ग्रामपंचायत प्रतिनिधींना आदिवासींसाठी असलेले कायदे आणि त्या विषयीची माहिती देईल.
केंद्र सरकार आपल्या देशातील आदिवासींच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे आदिवासींच्या कल्याणाचा उद्देश पूर्ण होऊ शकेल. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल असेल. हे काम लवकरच पूर्णत्वास येईल आणि अधिकाधिक लोक आणि संस्था या चळवळीमध्ये सहभागी होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आदिवासी लोक हे निसर्गाच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरण बचावासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहेत, असे मंत्र्यांनी विस्तृतपणे सांगितले.
श्री अर्जुन मुंडा यांनी स्पष्ट केले की, आदिवासी पंचायती राज संस्थांच्या (पीआरआय) बळकटीकरणात त्यांना त्यांच्या घटनात्मक हक्कांबद्दल शिक्षण देण्याचाही समावेश आहे. पंचायती राज संस्थांना त्यांच्या समुदायाच्या निर्णय घेण्याबाबत आणि विकासासंदर्भात अधिकार प्राप्त होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
श्रीमती रेणुका सिंग सरुता त्यांच्या भाषणात म्हणाल्या की, आदिवासी विकास मंत्रालय हे आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. अनेक बिगर सरकार संस्थांच्या सहकार्याने आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने, ज्या या क्षेत्रात अतिशय स्तुत्य उपक्रम करीत आहेत, अशांच्या सहयोगाने मंत्रालय काम करीत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांचे एक मोठे जाळे आहे, जे हा कार्यक्रम यशस्वी करतील.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आदिवासी लोक स्वच्छता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खूप जबाबदारीने वागतात म्हणून आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकले पाहिजे. शैक्षणिक अभ्यासक्रमात कौशल्य विकासाचा समावेश असलेल्या झारखंडच्या घाटशीला येथे आर्ट ऑफ लिव्हिंग शाळा चालविण्याच्या अनुभवावर ते सविस्तर बोलले. आर्ट ऑफ लिव्हिंग भारतभर 750 शाळा चालवित आहे. आपल्याकडे ग्रामीण भागाता दातांची स्वच्छता आणि मानसिक स्वच्छता दोन्ही गरजेच्या बाबी असल्याबाबत त्यांनी भर दिला. या आदिवासी कल्याण योजना यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक मनापासून काम करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
एमओटीएचे सचिव, श्री दिपक खांडेकर यांनी यापूर्वीत आदिवासी भागात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुरू असलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. आदिवासी विकास मंत्रालय आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची भागीदारी भविष्यात आणखी कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार करेल, असे त्यांनी नमूद केले.
‘पंचायती राज संस्थांचे सक्षमीकण’ याचा पहिला उपक्रम झारखंडमधील पाच जिल्ह्यातल्या 150 गावातील 30 ग्रामपंचायतीतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आदिवासींसाठी असलेले विविध कायदे आणि त्या विषयीची माहिती देण्यातून प्रारंभ होईल, ज्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना मिळू शकणार आहे. आदिवासी युवकांमधून काही युवक प्रतिनिधींनी पुढे यावे, त्यांना व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, त्यांच्यात सामाजिक जबाबदारी रुजविणे आणि अशा पद्धतीने आदिवासी नेतृत्त्वाचा विकास करणे, जे त्यांच्या समाजासाठी जनजागृती करण्यास मदत करू शकतील, अशा प्रकारे याची रचना करण्यात आली आहे.
दुसरा उपक्रम म्हणजे, महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील 10000 शेतकऱ्यांना गो – आधारित शेतकी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे. सेंद्रिय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला आत्मनिर्भर आदिवासी शेतकरी बनविण्यासाठी विपणन संधी देखील उपलब्ध करून देण्यात येतील.
M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667971)
Visitor Counter : 232