रसायन आणि खते मंत्रालय

शेतकर्‍यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 27,500 मे.टन खत तुतीकोरीन बंदरावर दाखल

Posted On: 28 OCT 2020 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020

 

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी) द्वारा आयात केलेल्या मूरिएट ऑफ पोटॅश खताची वाहतूक करणारे तिसरे जहाज सोमवारी तुतीकोरीन बंदरावर दाखल झाले. 

शेतकर्‍यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 27500 मे.टन पोटॅश खताची आयात केली आहे. सामान उतरवण्याचे व पोती भरण्याचे काम केले जात आहे.

  

या खेपीसह, फॅक्टने यावर्षी आतापर्यंत 82,000 मेट्रिक टन मूरिएट ऑफ पोटाशची आयात केली आहे.

एफएसीएटीचे मुख्य उत्पादन फॅक्टम फोस यासह मुरियट ऑफ पोटाश हे दक्षिण भारतातील शेतकर्‍यांचे आवडते खत आहे. कंपनी यावर्षी एमओपीच्या आणखी दोन ऑर्डर देण्याची योजना आखत आहे.

यापूर्वी खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने एमओपीची दोन आणि एनपीकेची एक खेप आयात केली आहे.

फॅक्ट ही देशातील सर्वात मोठ्या खतनिर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने यावर्षी खताचे उत्पादन व विपणन या बाबतीतही चांगली कामगिरी केली आहे.


* * *

B.Gokhale/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668129) Visitor Counter : 186