अर्थ मंत्रालय

आपण जर प्रामाणिक, एकनिष्ठ असू आणि आदर्श निर्मिती करत असू, तर सकारात्मक बदल आणण्यासाठी औद्योगिक क्षेत्र निश्चितच आपल्याला आदर्श मानेल : मा. राज्यपाल


आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी, सीमाशुल्क आता संपर्कविहित, कागदरहित आणि प्रत्यक्ष उपस्थिती विरहीत व्यापार आणि उद्योगाच्या सुलभतेसाठी प्रयत्नशील राहील- सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी

Posted On: 27 OCT 2020 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

भारतीय उद्योग परिसंघासह संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री बी. एस. कोश्यारी यांचे भाषण झाले. त्यानंतर कस्टम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चासत्र आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

माननीय राज्यपाल म्हणाले, आपण जर प्रामाणिक, एकनिष्ठ असू आणि आदर्श निर्माण करत असू तर उद्योग क्षेत्र निश्चितच सकारात्मक बदल घडविण्यासाठी आपल्या उदाहरणाचे अनुकरण करेल. हा वेबिनार आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करीत ते पुढे म्हणाले, कस्टम विभागाकडून संपर्कविहीन, कागदपत्रविहीन (पेपरलेस), फेसलेस कार्यपद्धती (प्रत्यक्ष उपस्थित न राहता) राबविली जाते जी केवळ उद्योगक्षेत्रा पुरतीच उपयोगी ठरेल असे नव्हे तर ती भ्रष्टाचार नष्ट करू शकेल, आणि हेच आत्मनिर्भर भारत उभा करण्यासाठी सहाय्यभूत देखील ठरेल.

सीमाशुल्क हे संपर्कविहीन, कागदपत्ररहित, फेसलेस होईल परंतु, व्यापार आणि उद्योगांच्या सोयीसाठी तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी नेहमी प्रयत्नशील राहील, असे केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अंतरर्गत करदाता सेवा महासंचालनालयाच्या विभागीय अतिरिक्त महासंचालक राजेश कुमार वर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले आणि रोल ऑफ कस्टम्स इन आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारतात सीमाशुल्क विभागाची भूमिका) विषयावर सादरीकरण केले.

डॉ. राजेश कुमार वर्मा यांनी विशेषतः कोविड-19 च्या कालावधीतील व्यापार आणि वाणिज्य व्यवहार सुलभ करण्यासाठी सीमाशुल्क विभागाने घेतलेल्या उपायांवर प्रकाश टाकला. त्यातील काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेत :

  • पुरवठा साखळीत कोणताही अडथळा होऊ नये म्हणून सर्व सानूकुल स्वरूपावर 24 X 7 सीमाशुल्क मंजुरी सुविधा लागू केली गेली आहे.
  • बाधित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबतच्या मंजुरीसाठी विशेष काळजी घेण्यात आली. विमानतळांवर, पोर्ट टर्मिनलवर आणि भू - सीमाशुल्क स्थानकांजवळ अशा प्रवाशांसाठी स्वतंत्र वाहिन्या निर्माण करून देण्यात आल्या होत्या. मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझर वापरण्याच्या सूचनांचे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे पालन केले.
  • भारताच्या प्रत्येक सीमाशुल्क विभागामध्ये नोडल ऑफिसर नेमला गेला आहे. ज्यास कार्गो मंजुरीशी संबंधित कोणत्याही मुद्यासाठी संपर्क साधता येईल. सीबीआयसीच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध आहे.
  • लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे खोळंबलेल्या कंटेरनरसाठी विलंबशुल्क आकारले जाऊ नये, असे शिपिंग लाइन्सला सुचविण्यात आले. 
  • मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि सामाजिक अंतर वाढवणे, आऊट ऑफ चार्ज वर्क, अधिकाऱ्यांमार्फत केले जाईल जे ईडीआयच्या कार्यपद्धतीशी जोडले आहे.
  • विभागीय मुख्य सीमाशुल्क आयुक्त यांनी लॉकडाऊन कालावधीत स्थानिक संरक्षक (आंतर्देशीय कंटेनर डेपो आमि कंटेनर फ्रेट स्टेशनः यांनी विमुद्रीकरण शुल्कात सूट देण्यास सांगितले आहे.

महासंचालक (पश्चिम), डीजीजीआय आणि मुख्य आयुक्त, मुंबई, श्रीमती रमा मॅथ्यू, मुख्य आयुक्त बेंगळुरू श्री डीपी नागेंद्र कुमार आणि प्रधान मुख्य आयुक्त पुणे- श्रीमती कृष्णा ए मिश्रा आणि सीमाशुल्क विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी उद्योगक्षेत्राकडून आणि त्यातील भागधारकांकडून आलेल्या शंकांचे निरसन केले. कार्यपद्धतीमध्ये बदल घडवून आणल्यामुळे निर्माण झालेल्या शंकांचे निरसन आणि त्याबाबतच्या भीतीचे निराकरण केले आणि आश्वासन दिले की नवीन प्रणालीतील सुधारणांमुळे व्यापाऱ्यांना आता प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसताना आयात आणि निर्यात करण्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी वितरण सेवा मिळेल आणि निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यांकन आणले जाईल.

महासंचालक (पश्चिम), डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स (डीजीजीआय) आणि मुख्य आयुक्त, मुंबई, श्रीमती रमा मॅथ्यू समारोपाच्या भाषणात नमूद करताना म्हणाल्या, सीमाशुल्क विभाग आपल्या भागधारकास प्रतिसाद देणारा आहे आणि प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय मूल्यांकन केल्यास प्रभावी वितरणही मिळवता येईल. व्यापाऱ्यांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि आयात निर्यात सुलभ करण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप केले जातील, असेही श्रीमती मॅथ्यू यांनी नमूद केले. डिजीटल रेकॉर्डच्या देखभालीच्या संदर्भात प्रधान मुख्य आयुक्त, पुणे -  श्रीमती कृष्णा शर्मा यांनी नमूद केले की, डीजिटलाइज्ड विभाग म्हणजे दीर्घकाळ पुढे जाण्याच्या मार्गावर सहाय्य ठरणारे आहे. विभागाच्या वतीने पोहोच वाढविण्याच्या दृष्टीने गरज व्यक्त करण्यावर भर देत, प्रधान मुख्य आयुक्त, बेंगळुरू - श्री डीपी नागेंद्र कुमार, म्हणाले अभिप्राय महत्त्वाचा आहे, आणि माहिती सामायिक करण्याच्यादृष्टीने विभागाच्या वतीने परस्परसंवादी कार्यशाळा आयोजित करीत आहे. सर्व सहभागींसाठी ही चर्चा अतिशय फलदायी आणि आकर्षक होती, आणि नियम, प्रक्रिया, सुधारणा समजून घेण्यासाठीच अशी व्यसपीठे उपलब्ध करून दिली जातात, असे नमूद करीत भारतीय उद्योग परिसंघाच्या श्रीमती तनुश्री बॅनर्जी यांनी आभार व्यक्त केले.

B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667999) Visitor Counter : 142


Read this release in: English