वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

स्वामित्व (दुरूस्ती) नियम, 2020 - फॉर्म 27 भरणे आणि त्यासंबंधित आवश्यकता सुलभ करणे तसेच प्राधान्य असलेल्या दस्तऐवजांचे सत्यापित इंग्रजी अनुवाद सादर करणे याबाबतचे बदललेले नियम

Posted On: 28 OCT 2020 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020

 

दिल्ली उच्च न्यायालयाने दि. 23.04.2018 रोजी दिलेल्या एका आदेशाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्रमांक डब्ल्यूपीसी-5599 ऑफ 2015 अनुसार भारतामधल्या व्यावसायिकांना आपल्या उत्पादनाचे बौद्धिक स्वामित्व घेणे अधिक सुलभ व्हावे यासाठी सल्ला मागण्यात आला होता.

स्वामित्व (दुरूस्ती) नियम, 2020 याची अंमलबजावणी दि. 19 ऑक्टोबर, 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. आता फॉर्म-27 भरणे आणि जे दस्तऐवज इंग्लिशमध्ये नाहीत, अशा महत्वाच्या कागदपत्रांचा अनुवाद करून तो सत्यापित करणे अशा गोष्टी सुलभ केल्या गेल्या आहेत. 

बौद्धिक स्वामित्व कायद्यानुसार फॉर्म-27 आणि नियम 131 (2) यामध्ये जे महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत:

  1. एक किंवा अनेक स्वामित्व घेण्यासाठी आता एकच फॉर्म-27 दाखल केला तरी चालणार आहे. या नियमामध्ये लवचिकता आणली आहे.
  2. दोन किंवा अधिक व्यक्तींना स्वामित्व देण्यास येत असल्यास  अशा व्यक्ती संयुक्त फॉर्म-27 दाखल करू शकतील
  3. स्वामित्वासाठी अर्ज दाखल करताना त्या व्यक्तीला अंदाजे महसूल / अर्जित मूल्य सादर करणे आवश्यक आहे
  4. मूळ मालकाच्या वतीने अधिकृत एजंटच्या मार्फत स्वामित्वासाठी फॉर्म-27 दाखल करता येणार आहे.
  5. फॉर्म-27 भरण्यासाठी आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून सध्या तीन महिने मुदत मिळते, ती वाढवून आता सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
  6. आर्थिक वर्षाच्या मधल्या काळामध्ये स्वामित्वासाठी फॉर्म-27 भरण्याची आवश्यकता असणार नाही.
  7. फॉर्म-27 मध्ये स्वामित्वासाठी आवश्यक असलेली माहिती सादर केल्यानंतरही स्वामित्व कायदा, 1970- कलम 146 (1) अनुसार नियंत्रकाकडे बौद्धिक स्वामित्व घेणा-या व्यक्तीकडून उत्पादनाविषयी अधिक माहिती कधीही जाणून घेण्याचे अधिकार कायम आहेत.

या संदर्भामध्ये नियम 21 मध्ये करण्यात आलेले महत्वपूर्ण बदल पुढील प्रमाणे आहेत:-

  1. जर प्राध्यान्य असलेले दस्तऐवज डब्ल्यूआयपीओच्या डिजिटल ग्रंथालयामध्ये उपलब्ध असतील तर अर्जदाराला भारतीय स्वामित्व कार्यालयामध्ये तेच दस्तऐवज पुन्हा सादर करण्याची आवश्यकता नाही.
  2. अर्जदाराने प्रमुख, महत्वाच्या दस्तऐवजांचा सत्यापित इंग्लिश अनुवाद सादर करणे आवश्यक आहे. संबंधित उत्पादन, लावलेला शोध याची नोंद करून त्याचे स्वामित्व देण्यायोग्य आहे की नाही याचा निर्णय प्राधान्य दाव्याच्या, दस्तऐवजांच्या वैधतेनुसार होणार आहे.

बौद्धिक स्वामित्व कायद्यामध्ये करण्यात आलेल्या या बदलांमुळे भारतामध्ये व्यावसायिक स्तरावर होत असलेल्या संशोधनविषयक कामांचे स्वामित्व घेण्यासाठी फॉर्म-27 सादर करून त्यासंबंधित प्राधान्य दस्तऐवजांचा सत्यापित इंग्लिश अनुवाद करण्याचे काम सुव्यवस्थित होऊ शकणार आहे.


* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668136) Visitor Counter : 157