PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 26 MAY 2020 8:00PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 26 मे 2020

 

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारताने आपली चाचणी क्षमता लक्षणीयरीत्या वाढविली असून आता तो उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. भारत आता दररोज अंदाजे 1.1 लाख नमुन्यांची चाचणी करीत आहे. प्रयोगशाळा, सुधारणा, आरटी-पीसीआर मशीन (वास्तविक वेळ -पॉलिमर चेन रिअक्शन मशीन) आणि मनुष्यबळ वाढवून ही क्षमता वाढविण्यात आली आहे. कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या तपासण्यासाठी आजमितीस भारताकडे एकूण 612 प्रयोगशाळा आहेत; त्यातील आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे 430 तर खाजगी क्षेत्राद्वारे 182 प्रयोगशाळा चालविल्या जातात. लक्षणे असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या चाचण्या करण्यासाठी आणि लक्षणे नसलेल्या स्थलांतरित मजुरांना गृह विलगिकरणात ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली राज्य/केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आली आहे. कोविड -19 चाचणीसाठी ट्रूनाट(TrueNAT) यंत्रे तैनात करण्याकरिता बहुतेक राज्ये / केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात (एनटीईपी) काम करीत आहेत. आरटी-पीसीआर-किट्स, व्हीटीएम, स्वॅब आणि आरएनए एक्सट्रॅक्शन किट्सचे स्वदेशी उत्पादक ओळखले गेले आहेत आणि गेल्या काही महिन्यांत त्यांचे उत्पादन सुकर केले आहे.

देशात रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत आहे आणि सध्या तो 41.61% आहे. कोविड-19 आजारातून आतापर्यंत एकूण 60,490 रुग्ण बरे झाले आहेत. देशात या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या प्रमाणातही 3.30% (15 एप्रिल रोजी) वरून सध्याच्या 2.87% घट होताना दिसून येत आहे. हे प्रमाण जागतिक स्तरावर कमीत कमी आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची जागतिक सरासरी सध्या 6.45% च्या आसपास आहे. दर लाख लोकसंख्येच्यामागे या आजाराने मृत्यू होण्याच्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की जगात प्रत्येक लाख लोकसंख्येमागे 4.4 मृत्यूचे प्रमाण आहे तर भारतात जगाच्या तुलनेत ते कमी म्हणजे 0.3 प्रति लाख आहे. दर लाख लोकसंख्येच्यामागे असलेले मृत्यूचे प्रमाण आणि मृत्यू दर याची तुलनेने कमी असलेली आकडेवारी ही वेळेवर रुग्ण चिकित्सा करून त्यांचे नैदानिक व्यवस्थापन दर्शविते.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि विशेष कार्य अधिकारी राजेश भूषण, यांनी आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्य सचिव, आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांसह उच्चस्तरीय आढावा बैठक (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) घेतली. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आणि आंतरराज्यीय स्थलांतर करण्यास परवानगी मिळाल्यामुळे या राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

कोविड -19 प्रकरणांमधील मृत्यूचा दर, दुप्पट होण्याचा काळ, दर दशलक्ष चाचणी आणि पुष्टीकरण टक्केवारी या संदर्भात प्रत्येक राज्यागणिक माहिती देण्यात आली. परीघ नियंत्रण, विशेष सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण, चाचणी, संपर्कातून बाधित असलेल्यांचा शोध आणि प्रभावी प्रयोगशाळा व्यवस्थापन यासारख्या प्रतिबंधात्मक धोरणांच्या आवश्यक त्या प्रभावी घटकांवर यावेळी लक्ष वेधण्यात आले. सूक्ष्म योजना योग्य प्रकारे राबवून त्यांच्या अंमलबजावणीद्वारे संसर्गाचा मार्ग शोधून त्यावर सुयोग्य सुधारणेचा अवलंब करण्यासाठी प्रत्येक प्रतिबंधात्मक क्षेत्राचे विश्लेषण करण्यावर यावेळी जोर देण्यात आला. बफर झोनमधील क्रियाकलापांचा देखील पुनरुच्चार करण्यात आला.

इतर अपडेट्स:

भारतीय रेल्वेने 25 मे 2020 पर्यंत संपूर्ण देशभरात 3274 “श्रमिक विशेष” गाड्या चालविल्या आहेत. या श्रमिक गाड्यांमधून 44 लाखांहून अधिक प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले आहेत. 25 मे 2020 रोजी 223 श्रमिक विशेष गाड्यांमधून 2.8 लाख प्रवाशांना नेण्यात आले. रेल्वेने प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांना 74 लाखांहून अधिक मोफत जेवण आणि 1 कोटींहून अधिक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले आहे. आज धावणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी आढळून आली नाही. श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त रेल्वेकडून दिल्लीहून 15 जोड्या विशेष गाड्या सोडल्या जात आहेत आणि 1 जून पासून अजून 200 गाड्या सुरु करण्याची योजना आहे.

लघु उद्योगांना आर्थिक पाठबळाची मदत करण्यासाठी सरकार नवीन आर्थिक कर्ज देणार्‍या संस्थांचा शोध घेत आहे असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले की, सरकार एनबीएफसींना अर्थात बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना बळकटी देण्याच्या दिशेने काम करीत आहे, ज्यामुळे आगामी काळात छोट्या व्यवसायांना सहज कर्ज मिळण्यास मदत होईल. एमएसएमईवर कोविड- 19 चा परिणाम आणि त्यापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांविषयी ते कोलकाता चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता covid-19 महामारी प्रकोपात अतिथ्य व्यवसाय (हॉस्पिटॅलिटी) मोठ्या कठीण काळातून जात आहे.  या व्यवसाय क्षेत्रावर महामारी आणि टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल्स तसेच इतर निवारा केंद्रांसाठी  मंजुरी किंवा प्रमाणपत्राची वैधतेची मुदत टाळेंबदीच्या कालावधीत संपत असल्यास (24.03.2020 ते 29.6.2020) ती 30.06.2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात काल दूरध्वनीवरून चर्चा झाली. अम्फान या चक्रीवादळामुळे उभय देशात झालेल्या नुकसानाचा आढावा त्यांनी परस्परांना दिला.कोविड महामारी बाबत परिस्थितीबाबत आणि या संदर्भात दोन्ही देशातले सहकार्य याबाबत या नेत्यांनी चर्चा केली.

कोविड -19 पासून बचावासाठी ट्रॅक्टरवर चालणारे निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र विकसित करणा-या नाशिककराची यशोगाथा : शेती करताना शेतकरी बांधव स्थानिक गरजा ओळखून त्यानुसार आपल्या शेतीच्या साधनांमध्ये व यंत्रसामुग्रीमध्ये बदल करत असतात. हे तांत्रिक ज्ञान ते आपल्या दैनंदिन अनुभवातून विकसित करत असतात. यामुळे त्यांना यंत्रसामुग्री वापरणे अधिक सोईचे, सुविधाजनक होत असते. असेच अभियांत्रिकी शिक्षण देणारे राजेंद्र जाधव यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्थानांची स्वच्छता करण्यासाठी स्व-अध्ययनातून एक यंत्र विकसित करता येईल का, याविषयी संशोधन सुरू केले. यासाठी त्यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणा-या यंत्रसामुग्रीचा प्राधान्याने विचार केला. अवघ्या 25 दिवसांमध्ये राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरवर बसवता येवू शकेल, असा नाविन्यपूर्ण फवारा यंत्रणा विकसित केली. या फवाऱ्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुवून काढणे शक्य होत आहे.

सरकारने 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत एन-95 मास्क अत्यावश्यक वस्तू म्हणून अधिसूचित केले आहेत. अशा प्रकारे अत्यावश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार कायद्यान्वये दंडनीय गुन्हा आहे.  अत्यावश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी एनपीपीएने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेश सरकारला सर्जिकल आणि संरक्षणात्मक मास्क, हॅन्ड सॅनिटायझर्स आणि ग्लोव्हजची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र त्यांची किंमत 13 मार्च 2020 च्या आदेशानुसार छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जास्त नसावी अशी सूचनाही केली आहे. देशात एन-95 मास्कची साठेबाजी, काळा बाजार आणि वेगवेगळे वाढीव दर याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात एनपीपीएने राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या राज्य औषध नियंत्रक(एसडीसी) / खाद्य आणि औषध प्रशासनाला (एफडीए) योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारी संस्थांनी यंदा केलेल्या गहू खरेदीनं गेल्या वर्षीच्या 341.31 लाख टन खरेदीला मागे टाकले असून, 24-5-2020 रोजी गहू खरेदी 341.56 टनांपर्यंत पोहोचली. कोविड-19 विषाणूचा फैलाव आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या सर्व अडथळ्यांना तोंड देऊन ही खरेदी झाली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज चारधाम परियोजनेअंतर्गत चंबा बोगद्याच्या यशस्वी कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्स मोडच्या माध्यमातून उदघाटन केले. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ऋषिकेश -धारासू रस्ते महामार्गावरील (एनएच94 ) वरील व्यस्त चंबा शहराच्या खाली 440 मीटर लांबीचा  बोगदा खणून हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. कोविड -19 आणि देशव्यापी लॉकडाऊनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा पहिलाच प्रकल्प पूर्ण झाला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोविड -19 साथरोगाचा सामना करण्यासाठी आपापल्या देशाने उचललेल्या पावलांविषयी उभय संरक्षणमंत्र्यांनी यावेळी चर्चा केली. कोविड-19 विरोधातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांमध्ये भारताने दिलेल्या योगदानाविषयी श्री.राजनाथ सिंग यांनी लिंडा रेनॉल्ड्स यांना माहिती दिली.

सध्याच्या परिस्थितीतही, कोविड -19 चा उद्रेक आणि लॉकडाउन आव्हानांच्या परिणामावर विजय मिळवून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून कार्यरत राहिले आहे. तसेच जेएनपीटी ने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करून जागतिक पुरवठा साखळी सक्रिय ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या लॉकडाउनने देशाच्या अर्थव्यवस्थेत शिपिंग सेक्टरची  अपरिहार्य भूमिका अधोरेखित केली आहे. जेएनपीटी ने लॉकडाउन दरम्यान 22 मार्च 2020 ते 24 मे 2020 या कालावधीत 610,405 टीईयू आणि 913,233 मे.टन लिक्विड आणि बल्क मालाची वाहतूक केली आहे.

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेला आणि ऊर्जा क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करणारा सार्वजनिक उपक्रम, आरईसी म्हणजेच ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्यावतीने सरकारी रुग्णालयातले आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच देशभरामध्ये शक्य असेल तिथे गरीब श्रमिकांना मोफत भोजनाची सुविधा देण्यासाठी अखंड प्रयत्न सुरू आहेत.

नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईने दिनांक  27 व 28 मे 2020 रोजी  यूट्यूब चॅनेलवर  दोन अतिशय महत्त्वाचे लॉकडाउन व्हर्च्युअल लेक्चर्स आयोजित केले आहेत.  “द फुरी ऑफ सायक्लोन अम्फान” याविषयावर  श्री. राजीव नायर, माजी संचालक, भारतीय मेट्रोलॉजिकल विभाग, मुंबई,  दिनांक 27 मे रोजी दुपारी 12.30 वाजता व्याख्यान देतील, तर दक्षिण अणुविद्यालय संशोधन संस्थेच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिता सेनगुप्ता यांचे  “स्पेस एक्स मेडेन अस्रोनंट फ्लाईट" या विषयावर व्याख्यान दिनांक 28 मे2020 ला सकाळी9.30 ला आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रात कोविड19 चे 2,436 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 52,667 इतकी झाली आहे.राज्यात 35,178 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 15,786 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत 1430 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत रुग्ण दुप्पट होण्याचा दर 3 दिवसांवरून 19 दिवसांवर गेला आहे. यावरून सरकारकडून अवलंबले गेलेले प्रतिबंधात्मक धोरण उपयोगी पडत असल्याचे दिसून येत आहे.

लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4,30,670  पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 5,65,726 व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे,अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

PIB FACT CHECK

 

******

R.Tidke/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1626975) Visitor Counter : 29