ऊर्जा मंत्रालय

आरईसी लिमिटेडच्या वतीने आघाडीच्या फळीतल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करण्यासाठी केला ताजसॅटसबरोबर सामंजस्य करार


सार्वजनिक उपक्रमातल्या संस्थेच्यावतीने 24 मे पर्यंत 4.58 लाख किलो खाद्यान्न, भोजनाचे 1.26 लाख पाकिटे, 9,600 लीटर सॅनिटायझर, 3,400 पीपीई संच आणि 83,000 मास्क केले वितरित

Posted On: 26 MAY 2020 3:21PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेला आणि ऊर्जा क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करणारा सार्वजनिक उपक्रम, आरईसी म्हणजेच ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्यावतीने सरकारी रुग्णालयातले आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच देशभरामध्ये शक्य असेल तिथे गरीब श्रमिकांना मोफत भोजनाची सुविधा देण्यासाठी अखंड प्रयत्न सुरू आहेत.

आरईसी प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक दायित्व अंतर्गत ताजसॅटसबरोबर एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार नवी दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातल्या वैद्यकीय कर्मचारी वर्गासाठी म्हणून बनवण्यात आलेल्या विशेष पौष्टिक आहाराची पाकिटे देण्यात येत आहेत. या करारानुसार दररोज 300 पौष्टिक खाद्यान्नाची पाकिटे पोहोचविण्यात येत आहेत. त्याचा लाभ आघाडीच्या फळीमध्ये कार्यरत असलेल्या कोरोना योद्धांना होत आहे. या उपक्रमा अंतर्गत नवी दिल्लीत 18,000 खाद्यान्न पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे.

याचबरोबर वेगवेगळ्या जिल्हयातल्या संबंधित अधिकारी, स्वयंसेवी संस्था, आणि विज वितरण कंपन्या यांच्यावतीने संपूर्ण देशभरामध्ये स्थानिक गरजा लक्षात घेवून शिजवलेले तयार पदार्थ, अन्नधान्य यांचे वितरण करण्यात येत आहे. आरईसीच्यावतीने संपूर्ण देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली, तेव्हापासून अशा पद्धतीच्या मदतीला प्रारंभ केला आहे. सध्याही अन्नधान्य, भोजन गरजवंतांना देण्याची मदत सुरू आहे. दि. 24 मे, 2020 पर्यंत आरईसीच्यावतीने 4.58 लाख किलोपेक्षा जास्त खाद्यान्न, भोजनाची 1.26 लाख पाकिटे, 9,600 लीटर सॅनिटायझर, 3,400 पीपीई संच आणि 83,000 मास्क यांचे वितरण केले आहे.

आरईसी म्हणजेच ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ हे एक नवरत्न एनबीएफसी आहे. संपूर्ण देशामध्ये ऊर्जा क्षेत्राला वित्त पोषण करून विकास घडवून आणण्याचे कार्य करते. या महामंडळाची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षापासून ही संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये मूल्य श्रृंखला निर्माण करण्यासाठी वित्तीय मदत उपलब्ध आरईसी करून देते. याशिवाय भारत सरकारने सुरू केलेल्या दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना (डीडीयूजीजेवाय) आणि सौभाग्य यासारख्या महत्वाकांक्षी योजनांची नोडल एजन्सी म्हणूनही आरईसी काम करते.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1626904) Visitor Counter : 233