नौवहन मंत्रालय

जेएनपीटी, भारताच्या विकासातील प्रमुख योगदानकर्ता

Posted On: 26 MAY 2020 7:03PM by PIB Mumbai

 

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी आपल्या ऑपरेशनल कार्यक्षमते मध्ये सुधारणा करण्यासाठी सतत नवनवीन उपाययोजना करीत आहे व आवश्यक त्या सुधारणा करीत आहे. बंदराच्या निरंतर विकास आणि विस्तारामुळे जेएनपीटीला राष्ट्र निर्मितीत मोलाचे योगदान देण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडण्यास मदत झाली आहे.

सध्याच्या परिस्थितीतही, कोविड -19 चा उद्रेक आणि लॉकडाउन आव्हानांच्या परिणामावर विजय मिळवून, जेएनपीटी अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून कार्यरत राहिले आहे. तसेच जेएनपीटी ने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करून जागतिक पुरवठा साखळी सक्रिय ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या लॉकडाउनने देशाच्या अर्थव्यवस्थेत शिपिंग सेक्टरची  अपरिहार्य भूमिका अधोरेखित केली आहे.

जेएनपीटी ने लॉकडाउन दरम्यान 22 मार्च 2020 ते 24 मे 2020 या कालावधीत 610,405 टीईयू आणि 913,233 मे.टन लिक्विड आणि बल्क मालाची वाहतूक केली आहे.

नियमित ऑपरेशन्स व्यतिरिक्त, जेएनपीटीने या आव्हानात्मक काळात आयात-निर्यात ग्राहक आणि भागधारकांना पाठिंबा दिला आहे. जेव्हा ट्रकांच्या तीव्र कमतरतेमुळे डीपीडी ग्राहक त्यांची डिलिव्हरी घेण्यास असमर्थ होते, तेव्हा जेएनपीटीने त्यांना आयसीडी मुलुंड आणि आयसीडी तारापूर येथे ‘विस्तारित गेट’ सुविधा उपलब्ध करून देऊन आणि कोणतेही अतिरिक्त शिफ्टिंग शुल्क न घेता त्यांचे कंटेनर तेथे रेल्वेने पाठवून सहाय्य केले आहे. 13 एप्रिलपासून 25 मे 2020 पर्यंत एकूण 77 ट्रेन्सच्या माध्यमातून डीपीडी कंटेनरच्या अतिरिक्त 5,538 टीईयू ची हाताळणी केली आहे.

जेएनपीटीने आजूबाजूच्या बंदरांमध्ये निर्यात बंद असतानाच्या कठीण काळातही हाजीरा येथील निर्यातदार ग्राहकांना सहाय्य केले आहे. एप्रिल 2020 पासून, जेएनपीटीने जेएन पोर्ट आणि दहेज / हजीरा दरम्यान आयात-निर्यात कंटेनरची रेल्वेद्वारा वाहतूक सुरू करून 3909 आयात-निर्यात कंटेनरची हाताळणी केली आहे आणि त्यानंतर 6 मे 2020 पासून जेएनपीटीच्या स्वतःच्या कंटेनर टर्मिनलने रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी आयसीडी दहेज पर्यन्त कॉनकोर च्या माध्यमातून रेल्वेद्वारे रिकामे कंटेनर पाठविण्याची सुविधा सुरू केली. वेळेवर केलेल्या या उपाययोजनांमुळे निर्यातदारांना मदत झाली तसेच जेएनपीटीची अंतर्देशीय कनेक्टिव्हिटी मजबूत झाली.

जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले की जेएनपीटी अशा प्रसंगी नेहमीच सर्वात पुढे असते . “जेएनपीटी हे भारताचे क्रमांक 1 चे कंटेनर पोर्ट आहे व गेल्या 31 वर्षांपासून अनेक वेळा अशा प्रकारची कामे केली आहेत आणि पुरवठा साखळीचा महत्त्वपूर्ण भाग बनत आपले कर्तव्य बजावून देशाच्या अर्थव्यवस्थेला कायम पाठिंबा दिला आहे. या लॉकडाऊनच्या काळात असंख्य उद्योग पूर्णपणे ठप्प झाले असताना जेएनपीटीचे कार्य निरंतर चालू होते, जेएनपीटीने या कठीण काळात वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा, इंधन आणि अन्न यासारख्या महत्वाच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरू ठेवले होते. खरे पाहता या वेळी कामगारांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा सर्वअधिक धोका होता, तरीही अभूतपूर्व अशा या संकटाच्या वेळी जेएनपीटीचे कर्मचारी आणि भागधारकांचे समर्थन आणि वचनबद्धता ही शौर्य आणि कठोर परिश्रमाची कहानी बननेली आहे.

जेएनपीटीने आज आपल्या कामकाजाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत आणि सध्या राबविण्यात येत असलेले मोठमोठे प्रकल्प व उपक्रमांमुळे जेएनपीटी परिवर्तनाचा पुढचा टप्पा नक्कीच गाठेल आणि जागतिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वोत्तम बंदरांच्या तुलनेत आपल्या सेवांचा दर्जा उंचावेल.

For media enquiries, please contact: 1) Rudranil Sengupta, Mob - +91 7045464142/ +91 97 0206 0204 Email – rudranil@conceptpr.com 2) Shubham Panjari Mob - +91 9833261798 Email – shubham@conceptpr.com

 

R.Tidke/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626964) Visitor Counter : 198


Read this release in: English