पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
प्रविष्टि तिथि:
25 MAY 2020 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि बांगला देशाच्या जनतेला ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या.
अम्फान या चक्रीवादळामुळे उभय देशात झालेल्या नुकसानाचा आढावा त्यांनी परस्परांना दिला.कोविड महामारी बाबत परिस्थितीबाबत आणि या संदर्भात दोन्ही देशातले सहकार्य याबाबत या नेत्यांनी चर्चा केली.या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताच्या सहकार्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला.पंतप्रधान शेख हसीना आणि बांगला देशाची जनता यांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1626845)
आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam