संरक्षण मंत्रालय
कोविड-19 च्या प्रतिकाराविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद
Posted On:
26 MAY 2020 5:28PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोविड -19 साथरोगाचा सामना करण्यासाठी आपापल्या देशाने उचललेल्या पावलांविषयी उभय संरक्षणमंत्र्यांनी यावेळी चर्चा केली. कोविड-19 विरोधातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांमध्ये भारताने दिलेल्या योगदानाविषयी श्री.राजनाथ सिंग यांनी लिंडा रेनॉल्ड्स यांना माहिती दिली. तसेच, या साथरोगाविरुद्धच्या जागतिक लढाईतील परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चाही केली. कोविड-19 नंतरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी इतर देशांसोबतच परस्पर सहकार्याने काम करण्यासाठी उभय देशांना भारत-ऑस्ट्रेलिया सामरिक भागीदारीमुळे एका मजबूत पाया मिळाला आहे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
'भारत-ऑस्ट्रेलिया सामरिक भागीदारी' च्या चौकटीत, द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्याचे उपक्रम पुढेही सुरूच ठेवण्यासाठी उभय राष्ट्राच्या संरक्षणमंत्र्यांनी वचनबद्धता प्रकट केली.
***
B.Gokhale/J.Vaishanpayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626928)
Visitor Counter : 238
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam