पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाने हॉटेल आणि तत्सम निवारागृहांच्या मंजूरी/वर्गीकरण यासाठीची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवली


टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स आणि पर्यटन वाहतूक ऑपरेटर्स यांसारख्या सर्व वर्गांना सहा महिन्यांसाठी सूट तसेच मुदतवाढ

प्रविष्टि तिथि: 26 MAY 2020 3:55PM by PIB Mumbai

 

वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटकांना अपेक्षित असणाऱ्या दर्जाच्या हॉटेल निवडीची खात्री पडावी म्हणून  हॉटेलना पर्यटन मंत्रालयाकडून दर्जा दर्शक स्टार रेटींग देण्याची पद्धत राबवली जाते.  वन स्टार ते थ्री स्टारफोर आणि फाइव स्टार मद्याविना किंवा मद्यासहित, फाइव स्टार डीलक्स, हेरिटेज (बेसिक), हेरिटेज (क्लासिक), हेरिटेज (ग्रॅंड), लिगसी विंटेज (बेसिक), लिगसी विंटेज(क्लासिक), लिगसी विंटेज(ग्रॅंड), अपार्टमेंट हॉटेल, गेस्ट हाऊस इत्यादी.  या वर्गीकरणाची आणि प्रमाणपत्राची वैधता 5 वर्षांसाठी असते.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता covid-19 महामारी प्रकोपात अतिथ्य व्यवसाय (हॉस्पिटॅलिटी) मोठ्या कठीण काळातून जात आहे.  या व्यवसाय क्षेत्रावर महामारी आणि टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल्स तसेच इतर निवारा केंद्रांसाठी  मंजुरी किंवा प्रमाणपत्राची वैधतेची मुदत टाळेंबदीच्या कालावधीत संपत असल्यास (24.03.2020 ते 29.6.2020) ती 30.06.2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

याच प्रकारे मंत्रालय प्रवास एजंट्स, टूर ऑपरेटर्स, साहसात्मक टूरचे ऑपरेटर्स, देशांतर्गत टूर ऑपरेटर तसेच  टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स यांचेही वर्गीकरण याच प्रकारे करते. भारतातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी तसेच या सुविधांचा दर्जा आणि सेवा याची कल्पना येण्यासाठी याचा उपयोग होतो.

या सेवांचे मुल्यांकन तसेच त्यांच्याकडून आलेल्या अर्जाच्या विभागणी करण्याचे काम covid-19 महामारी प्रकोपाच्या म्हणजेच मार्च 2020 पासूनच्या टाळेबंदी कालावधीत लांबणीवर टाकण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्रालयाने सर्व प्रकारचे टूर ऑपरेटर (स्थानिक, देशांतर्गत, साहसी टूर) ट्रॅव्हल एजन्ट्स आणि टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स यांना मंजुरी देण्यासाठी तसेच मुदतवाढीसाठी   खालील अटींवर सहा महिन्यांची सूट दिली आहे.

 (i) आधीच मंजुरी संपुष्टात आली असल्यास किंवा 20 मार्च 2020 (मंत्रालयाकडून तपासणीकाम  खंडित करत असल्याची सूचना जाहीर झाल्याची तारीख) नंतरच्या कालावधीत, टाळेबंदी कालावधी सुरू असेपर्यंतच्या कालावधीत सध्याची मंजुरीची मुदत संपत असल्यास.

(ii) त्यांनी सध्याच्या किंवा अगोदरच्या मंजुरीच्या नूतनीकरणासाठी पूर्वीच अर्ज केला असल्यास.

*****

S.Thakur/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1626907) आगंतुक पटल : 377
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Malayalam