विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विद्यार्थी आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई तर्फे यू ट्यूबच्या माध्यमातून येत्या 27 मे व 28 मे 2020 रोजी व्याख्यानांचे आयोजन
Posted On:
26 MAY 2020 2:25PM by PIB Mumbai
नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईने दिनांक 27 व 28 मे 2020 रोजी यूट्यूब चॅनेलवर दोन अतिशय महत्त्वाचे लॉकडाउन व्हर्च्युअल लेक्चर्स आयोजित केले आहेत. “द फुरी ऑफ सायक्लोन अम्फान” याविषयावर श्री. राजीव नायर, माजी संचालक, भारतीय मेट्रोलॉजिकल विभाग, मुंबई, दिनांक 27 मे रोजी दुपारी 12.30 वाजता व्याख्यान देतील, तर दक्षिण अणुविद्यालय संशोधन संस्थेच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिता सेनगुप्ता यांचे “स्पेस एक्स मेडेन अस्रोनंट फ्लाईट" या विषयावर व्याख्यान दिनांक 28 मे2020 ला सकाळी9.30 ला आयोजित करण्यात आले आहे.


या दोन्ही व्याख्यानांचा लाभ विद्यार्थी आणि सामान्य जनतेने घ्यावा असे आवाहन शिवाप्रसाद एम. खेनेड, संचालक, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई, (भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय) यांनी केले आहे. कृपया यूट्यूब चॅनेलवर थेट सहभागी होण्यासाठी येथे क्लीक करा - (http://www.youtube.com/c/NSCMumbai). या व्याख्यानांचा लाभ आपण घरून किंवा कार्यस्थळावरूनही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी. संपर्क:
१. साकेत सिंह कौरव, क्यूरेटर -एम: 99206 90201 आणि
2. श्री एस. एम. बाणी, ग्रंथालय अधिकारी, एम: 99875 9869
*****
B.Gokhale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626893)
Visitor Counter : 206