PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 10 JUN 2020 7:39PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 10 जून 2020

 

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

 

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

गेल्या 24 तासांत देशभरात कोविड-19 चे 5,991 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या  1,35,205,इतकी झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 1,33,632 इतकी आहे. पहिल्यांदाच बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या, सक्रीय रुग्णांपेक्षा अधिक झाली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आता  48.88टक्के इतका झाला आहे.

तसेच, पहिल्यांदाच,आयसीएमआरने केलेल्या चाचण्यांची संख्या देखील 50 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आतापर्यंत आयसीएमआर ने 50,61,332 चाचण्या केल्या आहेत. गेल्या 24 तासांत आसीएमआरने  1,45,216 चाचण्या केल्या. संसर्गित व्यक्तीमध्ये कोविड विषाणूचा संसर्ग आहे का हे तपासण्यासाठीची चाचणी क्षमता आयसीएमआर ने सातत्याने वाढवत नेली आहे. सध्या देशभरात 590 सरकारी आणि 233 खाजगी, अशा एकूण 823 प्रयोगशाळांमध्ये कोविडची चाचणी केली जाते.

कोविड-19 चा प्रादुर्भाव अधिक असलेल्या मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि बेंगरूळू या शहरांमध्ये राज्यातील आरोग्य विभागांना आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना सहाय्य, विशेषतः तांत्रिक मदत करण्यासाठी तसेच, सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

 

इतर अपडेट्स:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपिन्सचे राष्ट्रपती महामहिम रॉड्रिगो डयुटर्ट यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर चर्चा केली.

पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तराखंड राज्य सरकारबरोबर केदारनाथ धाम विकास आणि पुनर्निर्माण प्रकल्पाचा आढावा घेतला. या मंदिराच्या पुनर्रचनेसाठी आपल्या सूचना मांडताना पंतप्रधान म्हणाले की केदारनाथ आणि बद्रीनाथ सारख्या पवित्र स्थळांसाठी राज्य सरकारने विकास प्रकल्पांचा अशा प्रकारे काल्पनिक आराखडा तयार करावा आणि संरचना करावी जी काळाच्या कसोटीवर खरी उतरेल आणि तरीही पर्यावरणास अनुकूल तसेच  निसर्ग आणि त्याच्या सभोवतालशी एकरूप असेल. सध्याची परिस्थिती  आणि पवित्र स्थळांवर पर्यटक आणि यात्रेकरूंचा तुलनेने  कमी ओघ लक्षात घेऊन सध्याच्या बांधकाम हंगामाचा उपयोग सामाजिक अंतराचे निकष पाळत कामगारांना कामाची योग्य विभागणी करून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी करता येईल अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत समाविष्ट असणारी खाजगी रुग्णालये/ निदान केंद्रांमध्ये उपचार सुविधा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींविषयी सीजीएचएस लाभार्थ्यांकडून प्रातिनिधिक आढावा घेतल्यावर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व आरोग्य सेवा संस्थांना (एचसीओ) उपचार सुविधा देण्याविषयी आदेश जारी केला आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारांद्वारे कोविड-रुग्णालये म्हणून अधिसूचित केलेल्या सर्व सीजीएचएस समाविष्ट रुग्णालयांना, सीजीएचएसच्या नियमांनुसार योजनेतील लाभार्थ्यांना कोविडशी संबंधित सर्व उपचार सुविधा पुरवाव्या लागतील.

कोविड-19 महामारीचा संपूर्ण देशभर उद्रेक झाल्यामुळे सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक आणि पार्सल सेवांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम सुरू करण्यात आले, ते टाळेबंदी शिथिल केल्यानंतर अजूनही चालू आहे. ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि त्या वस्तूंचे वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष कोविड -19 संपूर्णपणे मालवाहतूक कॉरिडॉर सुरू ठेवले. यामुळे घरगुती क्षेत्राला आवश्यक असणारा माल त्याचबरोबर उद्योग क्षेत्रांची गरज पूर्ण करणारा अगदी वेळेवर योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्यात रेल्वेला यश आले. भारतीय रेल्वे 1 मे 2020 ते 31 मे 2020 या काळात 82.27 दशलक्ष टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे. ती आधीच्या महिन्यापेक्षा एप्रिल 2020 पेक्षा 25 टक्के जास्त आहे. रेल्वे खात्याने 1 एप्रिल 2020 ते 30 एप्रिल 2020 या काळात 65.14 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली होती.

ई-लर्निंग प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने एनसीईआरटी आणि रोटरी इंडिया यांच्यात डिजिटल माध्यमातून एक सामंजस्य करार करण्यात आला. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटी टीव्ही वाहिन्यांवरून अभ्यासक्रम प्रसारित करण्याबाबतचा हा करार असून मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखारियाल निशंक यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. मनुष्यबळ विभागाच्या सचिव अनिता करवाल देखील यावेळी उपस्थित होत्या.

महाराष्ट्रामध्ये  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणा-या कामामध्ये भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून अमरावती जिल्हा  द्वितीय क्रमाकांवर आहे. देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्च पासून देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती, देशातील गरीब जनतेला अशा स्थितीमध्ये रोजगार व उपजिवकेचे साधन मिळवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 1 एप्रिल 2020 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अर्थात मनरेगाच्या वेतनात 20 रुपयांची वाढ केली आणि या  मनरेगा अंतर्गत वेतनवाढीमुळे  मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ मनरेगाच्या कामासाठी  उपलब्ध झाले. 

कोविड-19 लॉक डाऊनच्या आव्हानात्मक काळात आपल्या सदस्यांना सुकर व्हावे यासाठी ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वैधानिक मंडळाने आपल्या सदस्यांना तत्पर आणि प्रभावी सेवा पुरवली. लॉक डाऊनच्या निर्बंध काळातही ईपीएफओने 36.02 लाख दाव्यांचा निपटारा करत गेल्या एप्रिल आणि मे 2020 या दोन महिन्यात सदस्यांना 11,540 कोटी रुपये प्रदान केले. यापैकी 4580 कोटी रुपयांचे 15.54 लाख दावे, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत  नुकत्याच आणलेल्या कोविड-19 एडव्हान्सशी संबंधित आहेत.

देशातील विविध शहरे आणि महानगरपालिका क्षेत्रात, पादचाऱ्यांना सोयीच्या ठरतील अशा बाजारपेठा तयार करण्याबाबत सर्व हितसंबंधीयांशी चर्चा करुन एक सर्वसमावेशक नियोजन आराखडा तयार करावा, आशी शिफारस केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने केली आहे. यासंदर्भात मंत्रालयाचे सचिव, दुर्गाशंकर मिश्रा यांनी सर्व राज्ये/शहरे/महानगरपालिकांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 10 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात पादचाऱ्यांसाठी किमान तीन बाजारपेठा आणि आणि 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात किमान एक बाजारपेठ विकसित करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या "स्किल इंडिया" उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड-एनएफएल या केंद्रीय खते विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने आपल्या कारखान्याजवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी (आयटीआय) सहयोग करायला सुरवात केली आहे, जेणेकरून युवकांना विविध व्यापार क्षेत्रात प्रशिक्षित करून अवजड आणि प्रक्रिया उद्योगात त्यांच्या रोजगाराच्या संधीत वाढ होईल.

व्यापार व अर्थव्यवस्थेतील मानकांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक मानक दिवस (डब्ल्यूएडी) दरवर्षी 9 जून रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मानक मंच (आयएएफ) व आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा मानक सहयोग (आयएलएसी) यांनी निर्णय घेतल्यानुसार  मानक: अन्न सुरक्षा सुधारणेही जागतिक मानक दिवस 2020 ची संकल्पना आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहनविषयक कागदपत्रांच्या वैधतेची मुदत सप्टेंबरपर्यंत आणखी वाढवली आहे. त्यानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना सूचनावली जारी केली आहे.

खासगी क्षेत्राला आपल्या क्षमता सुधारण्यासाठी इस्त्रोच्या सुविधा आणि इतर संपत्तीचा वापर करण्याची परवानगी देण्यात येईल, असे केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास (डोनर), पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुस-या कार्यकाळामध्ये पहिल्या वर्षात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेल्या कामगिरीची माहिती डॉ. सिंह यांनी दिली.

एसटीआयपी 2020 टाऊन हॉल मीट, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य धोरण (एसटीआयपी) 2020 तयार करण्यासाठी ट्रॅक-1 सार्वजनिक आणि तज्ञ सल्लामसलत प्रक्रिया, 12 जून 2020 रोजी भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के विजय राघवन आणि डीएसटीचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांच्या हस्ते सुरू केली जाईल.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात कोविडच्या 2,259 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे राज्यात एकूण रुग्णांची 90,787 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोविडमुळे 120 रुग्ण दगावले असून यामुळे या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,289 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 1,663 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उपचारामुळे बरे झालेल्यांची संख्या 42,638 इतकी झाली आहे. मुंबईत कोविडचे 1,015 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे शहरात एकूण रुग्णसंख्या 50,878 इतकी झाली आहे. शहरात आणखी 58 मृत्यू झाले असून एकूण मृत्यू संख्या 1,758 इतकी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी सुरू झाला त्या चीन मधील वूहान येथील रुग्ण संख्येपेक्षा मुंबईतील कोविडची रुग्णसंख्या जास्त झाली आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर वाढून 23 दिवस इतका झाला आहे तर, आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीत रुग्ण दुपटीचा दर वाढून 48 दिवसांवर आला आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात धारावीत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

FACT CHECK

 

 

Image

*****

RT/ST/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630723) Visitor Counter : 315