वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतीय गुणवत्ता परिषदेने साजरा केला जागतिक मानक दिवस 2020

अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी विश्वासार्ह, सक्षम मानक देण्याची भूमिका

Posted On: 10 JUN 2020 3:37PM by PIB Mumbai

 

व्यापार व अर्थव्यवस्थेतील मानकांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक मानक दिवस (डब्ल्यूएडी) दरवर्षी 9 जून रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मानक मंच (आयएएफ) व आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा मानक सहयोग (आयएलएसी) यांनी निर्णय घेतल्यानुसार  “मानक: अन्न सुरक्षा सुधारणे” ही जागतिक मानक दिवस 2020 ची संकल्पना आहे.

प्रमाणपत्र संस्थांकरिता राष्ट्रीय मानक मंडळ (एनएबीसीबी) तसेच चाचणी व मोजमापन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मानक मंडळ (एनएबीएल), या भारतीय गुणवत्ता परिषदेच्या दोन मानक मंडळांनी या दिनाच्या अनुषंगाने वेबिनार आयोजित केले होते; त्यात संबंधित हितधारक सहभागी झाले होते.

उदघाटनपर भाषणात प्रमुख पाहुण्या, एफएसएसएआय अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या अध्यक्ष रीटा टीओथिया म्हणाल्या, “एफएसएसएआयने निर्णय घेताना माहितीसाठी विश्वासार्ह, सक्षम मानकांची भूमिका मान्य केली आहे. कारण मान्यता प्राप्त अनुपालन मूल्यांकन संस्थांकडून देण्यात आलेली माहिती ही निर्णय घेण्यासाठी, अनुपालन चाचणी तसेच मानके ठरविणे यासाठी दृढ, खात्रीशीर, विश्वासार्ह आहे कि नाही याबाबत सरकार आणि नियंत्रकांना मदत म्हणून एनएबीसीबी आणि एनएबीएल यांनी लक्षपूर्वक काम केले आहे."

मान्यता मिळाल्यामुळे जागतिक व्यापारासोबत आर्थिक वाढही सुलभ होते. एफएसएसएआयने, एनबीसीबी व एनएबीएल बरोबर काम करत असलेल्या एफआरएसएएआयला नियामक भार पेलण्यास मदत करणारे व मान्यताप्राप्त अनुपालन मूल्यांकन संस्थांच्या सेवांचा वापर करून अनुपालन देखरेखीसाठी मदत करणारे वेगवेगळे क्षेत्र याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

त्यांच्या अभिभाषणात, आभासी मूल्यांकन संस्थागत करणे, राज्य अन्न परीक्षण प्रयोगशाळेची मान्यता, मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना प्रवीणता चाचणी (पीटी) करण्यास प्रोत्साहित करणे, वाढीव प्रमाणित संदर्भ साहित्यनिर्मिती उत्पादकांची संख्या (आरएमपी) वाढविणे, अन्न विश्लेषणासाठी चाचणी उपकरणे आणि त्याच्या प्रमाणीकरणासाठी एक मानक योजना, तसेच अन्न क्षेत्राशी संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी एकात्मिक प्रणाली यासह अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.

अन्न व सार्वजनिक पुरवठा विभागाचे सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, अन्न सुरक्षा हा देशातील सर्व व्यक्तींचा हक्क आहे आणि गेल्या काही वर्षांत यात एफएसएसएआयने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वाणिज्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या 6 राष्ट्रीय मानक परिषदांनी दर्जेदार परिसंस्था वाढविण्यासाठी आणि देशातील संबंधित हितधारकांना संवेदनशील बनविण्यात मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, दर्जेदार परिसंस्थेत मान्यता मिळवण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते; तसेच भारतीय गुणवत्ता परिषदेला या समर्थनासाठी दर्जेदार मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. देशातील अनुरुप मूल्यांकन पायाभूत सुविधा आणि ग्राहक सक्षमीकरणाच्या विकासाची आवश्यकताही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष आदिल जैनुलभाई, यांनी आपल्या महत्वपूर्ण भाषणात भर दिला की गुणवत्ता सुधारण्यात मदत करण्यासाठी मान्यता देणे, हे एक महत्त्वाचे साधन आहे, परंतु अंतिम उद्दीष्ट हे आहे की अन्न व इतर क्षेत्रातील उत्पादन व सेवांची गुणवत्ता सुधारणे. भारतातील अन्न सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कुवत व क्षमता वाढवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

भारतीय गुणवत्ता परिषदेचे सरचिटणीस, डॉ. आर. पी. सिंह यांनी या प्रसंगी बोलतांना भविष्यासाठी सहा कलमी कार्यक्रमाच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला; जसे कि देशाच्या वेगवेगळ्या भागांत अनुरूप मूल्यांकन प्रणाली वाढविणे; एफएसएसएएआयच्या पीपीपी मॉडेलला “सहज निवास, सहज विकास, सहज विशास” साठी काम करण्याला प्रोत्साहित करणे, भारतात प्रमाणपत्र मिळण्याच्या आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळण्याच्या दिशेने काम करणे; अनौपचारिक बाजार औपचारिकता. इतर दोन मुद्द्यांमधे लोकांच्या बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण समस्या दुप्पट प्रणालीद्वारे तपासण्यासाठी “राष्ट्रीय गुणवत्ता अभियान” सुरू करणे आणि एकाच ई-मंचावर सर्व नियामकांसह बाजार सर्वेक्षण व जलद इशारा यंत्रणा विकसित करणे.

जागतिक मानक दिन वेबिनारमध्ये दोन तांत्रिक सत्रेही घेण्यात आली. पहिल्या सत्रामध्ये अन्न सुरक्षेबाबत नियामकांच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले होते आणि अध्यक्षस्थानी एनपीएलचे संचालक तसेच एनएबीएलचे अध्यक्ष डॉ. डी. के. अस्वाल होते. दुसरे तांत्रिक सत्र, एनएबीसीबी चे अध्यक्ष श्याम बंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले आणि या सत्राचा भर अन्न सुरक्षे संदर्भात उद्योगाच्या दृष्टिकोनावर होता. सरकार, नियामक आणि उद्योगातील प्रख्यात व्यक्तींनी अन्न क्षेत्राशी संबंधित काही प्रमुख बाबींवर भाष्य केले. या अनुषंगाने पुढे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. दोन्ही मानक मंडळे दर्जेदार मोहिम तयार करण्यासाठी उद्योग आणि नियामक यांच्यासह कार्य करीत आहेत. दिवसभरात सुमारे 700 सहभागींनी वेबिनारमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि दिवसभरात सुमारे 1500 हून अधिक लोकांनी हा कार्यक्रम पाहिला.

 

S.Pophale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1630652) Visitor Counter : 80