आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकार आरोग्य योजनेत समाविष्ट सर्व रुग्णालये राज्य सरकारने कोविड केंद्र म्हणून सूचित केली, योजनेतील लाभार्थ्यांना उपचार सुविधा देण्यासाठी तरतूद

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2020 6:40AM by PIB Mumbai

 

सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत समाविष्ट असणारी खाजगी रुग्णालये/ निदान केंद्रांमध्ये उपचार सुविधा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींविषयी सीजीएचएस लाभार्थ्यांकडून प्रातिनिधिक आढावा घेतल्यावर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व आरोग्य सेवा संस्थांना (एचसीओ) उपचार सुविधा देण्याविषयी आदेश जारी केला आहे.

मंत्रालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारांद्वारे कोविड-रुग्णालये म्हणून अधिसूचित केलेल्या सर्व सीजीएचएस समाविष्ट रुग्णालयांना, सीजीएचएसच्या नियमांनुसार योजनेतील लाभार्थ्यांना कोविडशी संबंधित सर्व उपचार सुविधा पुरवाव्या लागतील. त्याचप्रमाणे, जी सीजीएचएस रूग्णालये कोविड रुग्णालये म्हणून अधिसूचित नसतील ती सर्व सीजीएचएस रूग्णालये सीजीएचएस लाभार्थींना उपचार सुविधा / प्रवेश नाकारू शकणार नाहीत आणि इतर सर्व उपचारांसाठी सीजीएचएसच्या नियमानुसार शुल्क आकारतील असे निर्देश देण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल.

कोविड-19शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः

https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

 

कोविड-19शी संबंधित तांत्रिक प्रश्न  technicalquery.covid19[at]gov[dot]in  यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

 

कोविड-19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा: +91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर.

कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  यावर उपलब्ध आहे.

 

S.Pophale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1630708) आगंतुक पटल : 343
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam